बॅगेत बॉम्ब ठेवल्याचा फेक कॉल करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल.

Homeताज्या बातम्याशहरं

बॅगेत बॉम्ब ठेवल्याचा फेक कॉल करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल.

बॅगेत बॉम्ब ठेवल्याचा फेक कॉल करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल

अंबरनाथ रेल्वे स्थानकात  एका व्यक्तीने बॅगेत बॉम्ब ठेवल्याचे सांगून रेल्वे पोलिसांची रात्रभर झोप उडवणाऱ्या दोघांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी बेड्

इर्शाळवाडीतील 57 बेपत्ता ग्रामस्थांना मृत घोषित
गोवा बनावटीच्या दारूसह सहा लाखांचा मुद्देमाल जप्त व एकास अटक! l LokNews24
डॉ. कुमार सप्तर्षी यांना मातुःश्री पद्मिनीबाई बन साधना पुरस्कार प्रदान

अंबरनाथ रेल्वे स्थानकात  एका व्यक्तीने बॅगेत बॉम्ब ठेवल्याचे सांगून रेल्वे पोलिसांची रात्रभर झोप उडवणाऱ्या दोघांना कल्याण लोहमार्ग पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत .अतुल प्रजापती (Atul Prajapati) आणि  प्रदीप प्रजापती (Pradeep Prajapati) असे अटक केलेल्या आरोपीचे नावे असून दोघेही कळवा भागात राहणारे रहिवासी आहेत. रात्रीच्या वेळी एका कॉलरने रेल्वेच्या हेल्पलाइन क्रमांकावर फोन केला. अंबरनाथ (Ambernath) रेल्वे स्थानकात एका बॅग मध्ये बॉम्ब ठेवल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर ताबडतोब बॉम्बशोधक पथक,(Bomb Squad,) कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, रेल्वे स्थानकात सुमारे १५० लोहमार्ग पोलिसांचे पथक अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या (Ambernath railway station) घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर रेल्वे पोलीस पथकाने प्लॅटफॉर्मवरील प्रत्येक लहान-मोठ्या गोष्टीची आणि प्रवाशांची तपासणी केली . मात्र पोलिसांना स्टेशन परिसरात काहीही आढळून आले नसल्याने पोलिसाने कंट्रोल फोन करणाऱ्या मोबाईल नंबरचा शोध सुरू करत दोन जणांना कळवा परिसरातून ताब्यात घेतले .दोघांवर गुन्हा दाखल करत पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे

बॅगेत बॉम्ब ठेवल्याचा फेक कॉल.

COMMENTS