Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विवाहितेच्या छळवणूक प्रकरणी पतीसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल 

अहमदनगर : विवाहित महिलेस सासरी शारीरिक व मानसिक छळवणूक करुन तिला शिवीगाळ,मारहाण करून,शेतीतील अवजड कामे करवून घेऊन तिला उपाशी पोटी ठेऊन घरातून हाक

BREAKING: जिल्हा प्रशासनाकडून 24×7 कंट्रोल रूम कार्यान्वित ;LokNews24
वर्ल्ड बुक रेकॉर्ड पुरस्कार मतदारसंघातील जनतेला समर्पीत LokNews24
ग्रामपंचायत सदस्यावर गावठी कट्ट्यातून झाडल्या चार गोळ्या l पहा LokNews24

अहमदनगर : विवाहित महिलेस सासरी शारीरिक व मानसिक छळवणूक करुन तिला शिवीगाळ,मारहाण करून,शेतीतील अवजड कामे करवून घेऊन तिला उपाशी पोटी ठेऊन घरातून हाकलून दिल्याची घटना वालचंदनगर पुणे येथे घडली. या बाबतची माहिती अशी की दिपाली सुरेश जमदाडे हिचा विवाह मे 2019 रोजी झाल्यानंतर तिला सासरी सुरुवातीचे काही दिवस चांगले वागवले त्यानंतर तिचा पती सासू व ननंद यांनी तिचा शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. त्याबद्दल तिने तिच्या वडिलांना सांगितले तेव्हा तिच्या वडिलांनी तिच्या सासरच्या लोकांना समजावून सांगण्याकरता गेले असता त्या लोकांनी तिच्या वडिलांना घरात न घेता शिवीगाळ दमदाटी  केली व तिला घेऊन जा असे म्हटले. त्यानंतर दिपालीला खूप त्रास देऊ लागले तिला शेतीची अवजड काम सांगून उपाशी पोटी ठेवून शिवीगाळ व मारहाण केली . अपमानकारक बोलत असे तिचा पती रात्री अपरात्री फोनवर परस्त्रियांशी बोलायचा त्याबद्दल विचारणा केली असता तिला शिवीगाळ  करायचा. या त्रासाला कंटाळून दिपाली ही माहेरी निघून आली नगर येथे आल्यावर तिने पती विरुद्ध भरोसा सेल येथे तक्रार दाखल केली. भरोसा सेल येथेही यांचा समझोता न झाल्याने भरोसा सेल ने गुन्हा दाखल करणे बाबत त्यांना पत्र दिले. याप्रकरणी दिपाली जमदाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुरेश रमेश जमदाडे सासू छाया रमेश जमदाडे, ननंद स्नेहल रमेश जमदाडे यांच्या विरुद्ध गुन्ह्याचे नोंद केली.

COMMENTS