Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 मद्यपी वाहन चालवणाऱ्या चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

अहमदनगर : काहीतरी मादक द्रव्य पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली ही कारवाई नगर पुणे रोडवरील

भाजपने नाविन्यपूर्ण योजनांतून केला देशाचा विकास ः आमदार मोनिका राजळे
धनगर समाजासाठी एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी
व्हीडीओ कॉलवर क्यूआर कोडस्कॅन करून 51 हजार लुटले

अहमदनगर : काहीतरी मादक द्रव्य पिऊन वाहन चालवणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली ही कारवाई नगर पुणे रोडवरील इंम्पेरिअल चौक येथे घडली.

या बाबतची माहिती अशी की कोतवाली पोलिस शहरात नाकाबंदी करीत असताना एक इसम त्याची होन्डा कंपनीची ड्रीम युगा ही वेड्यावाकड्या रितीने व लोकांचे जिवितास धोका पोहचेल अशा रितीने चालविताना दिसल्याने त्या इसमास थांबविले असता त्याची होन्डा कंपनीची ड्रीम युगा गाडीचा नंबर एम एच 23 ए एल 8113 असा असल्याचे दिसले. तेव्हा त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव महेश सर्जेराव घुगे (वय 24 वर्षे रा. मु.पो. लिंम्बोडी ता. आष्टी जि.बिड) असे सांगितले. त्या इसमाने काहीतरी मादक द्रव्य सेवन केल्यासारखे त्याचा आंबट उग्रवास येत असल्याने चालकास सिव्हील हॉस्पीटल येथे मादक द्रव्याचे सेवनाचे अनुषंगाने तपासणी केली असता वाहन चालक मादक द्रव्याचे आमलाखाली असल्याचा वैदयकिय अधिकारी यांनी लेखी अभिप्राय दिला आहे.

 या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल तोहसीन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन वाहन चालकाविरुध्द भा द वि कलम 336 सह मोटार वाहन कायदा कलम 185 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली

COMMENTS