Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाहतुकीस अडथळा करणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल 

अहमदनगर : वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा परिस्थितीत रस्त्याचे मधोमध उभी वाहन उभे करणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध कोतवाली पोलिसांनी कारवाई केली. ही का

निळवंडेचा लोकार्पण कृती समितीचे आंदोलक स्थानबद्ध
एस.एस.जी.एम. महाविद्यालयात गांधी विचार संस्कार परीक्षा उत्साहात
निळवंडे उपकालव्यांचे काम सुरू करून बंधारे भरून द्या

अहमदनगर : वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा परिस्थितीत रस्त्याचे मधोमध उभी वाहन उभे करणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध कोतवाली पोलिसांनी कारवाई केली. ही कारवाई नगर पुणे रोडवरील पुणे बसस्टॅण्ड, समोर केली. 

या बाबतची माहिती अशी की कोतवाली पोलिस ठाणे हददीत वाहतुक नियमन, ट्रॅफिक केसेस करीता व पेट्रोलिंग ड्युटी करीत असता  अ.नगर येथे मारुती सुझुकी कंपनीची एर्टिगा  मॉडेलची चार चाकी कार (क्रमांक. एम एच 46 बी एफ  3595) यावरील चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा परिस्थितित रस्त्याचे मधोमध उभी केले असल्याचे मिळुन आल्याने त्या चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव पद्माकर जनार्दन वाहूळे (वय 29 वर्षे रा. आरळ तालुका वसमत, जिल्हा हिंगोली )असे असल्याचे सांगितले. त्या वाहन चालकास वाहनासह कोतवाली पोलीस ठाण्यात आणले.

या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी पोलिस कॉन्स्टेबल तोहसीन शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पद्माकर वाहुळे याच्या विरुद्ध भारतीय दंड विधान कायदा कलम 283 अन्वये गुन्ह्याची नोंद केली.पुढील कारवाई पोलिस हवालदार विजय काळे करीत आहे.

COMMENTS