Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वडी येथे मांडुळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

औंध / वार्ताहर : वडी, ता. खटाव येथील एकाने मांडुळ बेकायदेशीरपणे बाळगल्याप्रकरणी वन विभागाने गुन्हा दाखल केला असून त्याच्याजवळील जिवंत मांडुळ जप्त

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकार्‍यांचा आ. जयंत पाटील यांना पाठिंबा
चांदोली धरणातून 3800 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू
शेतकर्‍यावर रानडुक्कराचा भिषण हल्ला; शेतकरी गंभीर जखमी

औंध / वार्ताहर : वडी, ता. खटाव येथील एकाने मांडुळ बेकायदेशीरपणे बाळगल्याप्रकरणी वन विभागाने गुन्हा दाखल केला असून त्याच्याजवळील जिवंत मांडुळ जप्त करण्यात आले आहे. अंदाजे अडीच ते तीन किलोचे ते मांडूळ आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, वडी येथील नवनाथ भागवत येवले (वय 42) याने जिवंत मांडूळ पकडल्याची माहिती वनविभागाच्या पथकाला मिळाली होती.त्यानुसार जिल्हा वनसंरक्षक अधिकारी आर. ए. व्होरकाटे व औंधचे सपोनि प्रशांत बधे यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभाग व पोलीस पथकाने संयुक्तपणे वडी येथे छापा मारून नवनाथ येवले यांच्यासह जिवंत मांडूळ ताब्यात घेतले. या धडक कारवाईमुळे औंध परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईमध्ये वनपाल रामदास घावटे, बी. एस. जावीर, बी. एन.जाधव, सी. बी. पाटील, डी. एन. व्हनमाने, एस. एम. तांबोळी, एस. आर. दहिफळे, एम. एन. मोहिते, सर्पमित्र प्रसाद गुरव यांनी सहभाग घेतला. या आरोपीस न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची वनकोठडी मिळाली आहे. वन विभाग व पोलीस पथकाच्या धडक कारवाईमुळे वन्यप्राणी बाळगणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

COMMENTS