Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिंदू गर्जना मोर्चात तलवार फिरविल्याप्रकरणी माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांच्यावर गुन्हा दाखल

  सोलापूर प्रतिनिधी - दोन दिवसांपूर्वी सोलापुरात संघ परिवाराने आयोजित केलेल्या हिंदू गर्जना मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते

एकविरा फाउंडेशनच्या ग्रंथालयास पुस्तके भेट
गोबरगॅसच्या टाकीत पडून बापलेकासह चौघांचा मृत्यू
अंगणवाडी सेविकांचे राज्यस्तरीय आंदोलन

  सोलापूर प्रतिनिधी – दोन दिवसांपूर्वी सोलापुरात संघ परिवाराने आयोजित केलेल्या हिंदू गर्जना मोर्चामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे स्थानिक नेते माजी महापौर महेश कोठे यांचे पुत्र माजी नगरसेवक प्रथमेश कोठे हे तलवार बाळगून हवेत फिरविल्याप्रकरणी अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे.

फौजदार चावडी पोलीस ठाण्यात प्रथमेश कोठे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.पोलीस नाईक विनोद व्हटकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार प्रथमेश कोठे हे हिंदू गर्जना मोर्चामध्ये सहभागी झाले होते. मोर्चा माणिक चौकात पोहोचला असता प्रथमेश कोठे यांनी मोर्चात लाल वेष्टनात गुंडाळून आणलेली तलवार हातात बाळगली आणि मोर्चेकऱ्यांच्या गर्दीमध्ये तलवार हवेत फिरविली. सदर घटनेचा विडिओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

COMMENTS