अहमदनगर/प्रतिनिधी - दोन समाजात धार्मिक व जातीय शत्रुत्वाची व व्देषाची भावना निर्माण होईल असा आक्षेपार्ह मेसेज मोबाईल वरील व्हाट्सअप वर पाठवल्या

अहमदनगर/प्रतिनिधी – दोन समाजात धार्मिक व जातीय शत्रुत्वाची व व्देषाची भावना निर्माण होईल असा आक्षेपार्ह मेसेज मोबाईल वरील व्हाट्सअप वर पाठवल्याची घटना दि. 2 रोजी दुपारी बागरोजा हाडको दिल्लीगेट येथे घडली.
याबाबतची माहिती अशी की तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक तन्वीर शेख यांच्या मोबाईलवर व्हाट्सअप मेसेज आला तो त्यांनी वाचला असता सदर मेसेज हा फैजल अरिफ सय्यद (रा. बागरोजा हाडको अ.नगर ) याने त्याच्या मोबाईलवरून पाठवल्याचे निष्पन्न झाले. या मेसेजमुळे समाजात नुकसानकारक व घातक असा मेसेज जाऊन दोन समाजात धार्मिक व जातीयता ते निर्माण होईल असा असल्याने त्यांनी याबाबत वरिष्ठांकडे माहिती दिली.
या प्रकरणी पोलिस नाईक तनवीर शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फैजल अरिफ सय्यद याच्या विरुद्ध भारतीय दंड विधान कायदा 505 ( 2 ) प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली असून अधिक तपास पोलिस निरीक्षक मधुकर काळे करीत आहे
COMMENTS