Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

व्यावसायिकाने पत्नीची हत्या करून केली आत्महत्या

अहमदनगर शहरातील घटना

अहमदनगर/प्रतिनिधी ः घरगुती वादातून पत्नीची हत्या करून पतीने घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना स्टेशन रोडवरील शिवनेरी चौकातील आयकॉन

पुस्तकं खरेदी करण्यासाठी पैसे नसल्याच्या कारणामुळे नववीतील चौदा वर्षीय मुलीने घेतला गळफास
पैशाच्या त्रासाला कंटाळून गजराज नगरमध्ये एकाची गळफास
दारूच्या नशेत एकीने घेतला गळफास तर दुसरी बेशुद्ध

अहमदनगर/प्रतिनिधी ः घरगुती वादातून पत्नीची हत्या करून पतीने घराच्या छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना स्टेशन रोडवरील शिवनेरी चौकातील आयकॉन पब्लिक स्कूलजवळ गुरुवारी सकाळी निदर्शनास आली.
याबाबतची माहिती अशी की संदीप रामचंद्र गुजर (वय 53) व आशा संदीप गुजर (वय 50) यांचा पुणे येथे असलेल्या मुलाने बुधवारी रात्री फोन करून त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा संपर्क होऊ शकला नाही म्हणून त्याने घराजवळील त्याच्या मित्रास घरी जाऊन पाहण्यास सांगितले वाजता त्याचा मित्र गुजर यांच्या घरी गेला दरवाजा वाजूनही दरवाजा उघडला नाही म्हणून त्यांनी खिडकीतून आज पाहिले असता त्याला संदीप गुजर हे गळफास घेऊन स्वतःला लटकत असलेले दिसले त्याने घाबरून शेजारी असणारे लोकांना असते ही माहिती दिली या घटनेची माहिती मिळतात नगरसेवक प्रशांत गायकवाड तेथे आले त्यांनी घटनेचे गांभीर्य पाहून पोचली पोलीस ठाण्यात फोन केला या घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळतात पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव पोलिस उपाधीक्षक अनिल कातकडे पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचले. गुजर यांच्या घराचे दरवाजे आतून बंद असल्याने दरवाजा तोडून पोलिसांनी आज प्रवेश केला असता आत मध्ये संजय गुजर यांचा मृतदेह आढळून आला तसेच घराच्या आतील भागात सौ आशा गुजर यांचा मृतदेह मिळून आला. पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली असता व तिने प्रथम पत्नीला जिवेश ठार मारून नंतर स्वतः गळफास घेतला अशी माहिती समजली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह शिवविच्छेदनाकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवले. याप्रकरणी पोलिसांनी प्रथम आकस्मात मृत्यूची नोंद केली अधिक तपास कोतवाली पोलिस करीत आहे. गुजर दांपत्याने स्टेशन रोड परिसरात नुकतेच नवीन घर खरेदी केले होते त्या घराची खरेदी सोमवारी आठ तारखेस होणार असून दिनांक 12 रोजी घराची वास्तूशांती होणार होती. अशी माहिती शेजारी असलेल्या नागरिकांतून मिळाली.

COMMENTS