मोठी दुर्घटना; 39 जवानांसह नदीपात्रात कोसळली बस, 6 जणांचा मृत्यू .

Homeताज्या बातम्यादेश

मोठी दुर्घटना; 39 जवानांसह नदीपात्रात कोसळली बस, 6 जणांचा मृत्यू .

या दुर्घटनेत सहा जवान शहीद झाल्याची माहिती समोर

जम्मू काश्मीर प्रतिनिधी- जम्मू काश्मीर(Jammu and Kashmir) मधून मोठी बातमी समोर आली आहे. काश्मीरच्या पहलगाम येथील चंदनवाडी(Chandanwadi) परिसरात जवाना

आता मैदानात उतरलोय काय होईल ते बघून घेऊ – चंद्रकांत खैरे
राष्ट्रवादीचे विलीनीकरण शक्य ?
पुरवठा अधिकार्‍याच्या खुर्चीचा ताबा घेतला सेल्समनने

जम्मू काश्मीर प्रतिनिधी- जम्मू काश्मीर(Jammu and Kashmir) मधून मोठी बातमी समोर आली आहे. काश्मीरच्या पहलगाम येथील चंदनवाडी(Chandanwadi) परिसरात जवानांची एक बस दरीमध्ये कोसळली. पहलगाम च्या बेताब खोऱ्यात ही दुर्घटना घडली. या बसमध्ये 39 जवान होते. आतापर्यंत या दुर्घटनेत सहा जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनास्थळी युद्धपातळीवर मदत आणि बचावकार्य सुरू आहे. या भीषण अपघातात अनेक जवान गंभीर जखमी झाले आहेत.

COMMENTS