वडोली भिकेश्वर : विज अंगावर पडल्याने मृत्यूमुखी पडलेला बैल. मसूर / वार्ताहर : मसूरसह परिसरात विजांच्या कडाटासह जोरदार पाऊस झाला. वडोली भिकेश्वर,
वडोली भिकेश्वर : विज अंगावर पडल्याने मृत्यूमुखी पडलेला बैल.
मसूर / वार्ताहर : मसूरसह परिसरात विजांच्या कडाटासह जोरदार पाऊस झाला. वडोली भिकेश्वर, ता. कराड येथील सर्जेराव बाजीराव शेडगे हे मळा नावाच्या शिवारात उसात काही तरी बैलाच्या साहाय्याने काम करत असताना बैलावर वीज पडून बैल जागीच ठार झाला. त्यामुळे सर्जेराव शेडगे यांच्या कुटुंबाची मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली. या सर्व घटनेचा त्वरित पंचनामा होऊन सर्जेराव शेडगे यांना त्वरीत शासकीय मदत मिळावी, अशी मागणी शेतकरी बांधवांनी केली आहे.
पावसाळा सुरू झालेपासून आज झालेला पाऊस खर्या अर्थाने ढगफुटी सारखा पाऊस झाला. कधीही पावसाळ्यात यादिवसात विजांचा कडकडाट होत नाही. मसूर परिसरात पडलेला हा पाऊस इतका जोरदार पडला की बहुतेक ढगफुटी सारख परिस्थिती उद्भवली वादळी वार्यासह पडलेल्या पावसामुळे चांगलीच तारांबळ उडालेली दिसून आली. जागोजागी मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले दिसून येत होते. वळीवासारखा पाऊस पडत असल्याने व त्यातच वादळी वार्यासह विजेच्या मोठ्या प्रमाणात होणारा कडकडाटाने ग्रामस्थही भयभीत झाले आहेत. पावसाने दोन-तीन दिवस थोडीफार उघडीप दिल्याने शेतकर्यांची शेतातील विविध कामे सुरू होती. त्याचप्रमाणे या दोन-तीन दिवसात उन्हाचा तडाखाही मोठ्या प्रमाणात जाणवत होता. त्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल, असे वातावरणात दोन दिवसात झाले होते. मात्र, शनिवारी पडलेल्या पावसाने कहर केला. या पावसाने बर्याच भागातील शेतात पाणीसाठा साचून राहिला होता.
COMMENTS