Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगरमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात मोठा राडा

अहमदनगर प्रतिनिधी - डान्सर गौतमी पाटील आणि वाद हे जणू समीकरणच बनलं आहे. गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटलं की तरुणाईची गर्दी होणार हे नक्की. मात्

महाराजा होळकरांचे कार्य समाजासाठी स्फूर्तिदायक ः विवेक कोल्हे
चोरीस गेलेल्या दोन बुलेटसह सहा दुचाकी जप्त
राहुरी फॅक्टरी फातिमा माता चर्चच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

अहमदनगर प्रतिनिधी – डान्सर गौतमी पाटील आणि वाद हे जणू समीकरणच बनलं आहे. गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटलं की तरुणाईची गर्दी होणार हे नक्की. मात्र गौतमीच्या कार्यक्रमादरम्यान बेभान झालेल्या तरुणांमुळे अनेकदा गोंधळ झाल्याचं दिसून आलं आहे. आता अहमदनगरमध्ये गौतमीच्या कार्यक्रमात दगडफेकीची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवनागापूरच्या सरपंचाच्या नातीच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. गौतमीचा कार्यक्रम म्हणून मोठ्या संख्येने तरुणांनी येथे उपस्थिती लावली होती. गौतमीचा कार्यक्रम सुरू असताना हुल्लडबाजांनी कार्यक्रमात गोंधळ घालायला सुरुवात केली. मात्र चोख सुरक्षाव्यवस्था नसल्याने गोंधळ वाढत गेला आणि तेथे दगडफेक झाली. हुल्लडबाजांच्या या दगडफेकीत एक महिला किरकोळ जखमी झाली आहे. एमआयडीसी पोलीस आणि खाजगी बाउन्सर समोर हुल्लडबाजांनी धिंगाणा घातला. या सगळ्या गोंधळानंतर गौतमी पाटीलला डान्सचा कार्यक्रम अर्ध्यावरच बंद करावा लागला. यापुढे आयोजकांनी व्यवस्थित बंदोबस्त ठेवला नाही तर कार्यक्रम घेणार नसल्याचा इशाराच गौतमीने दिला आहे

COMMENTS