Homeताज्या बातम्याविदेश

इंग्लंड संघाला मोठा धक्का, ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार्‍या मालिकेतून ‘हा’ खेळाडू बाहेर

इंग्लंड क्रिकेट संघाला एक मोठा धक्का बसला आहे. इंग्लंड संघाला जोफ्रा आर्चरच्या रूपाने धक्का बसला आहे. आयपीएल 2023 मध्ये जोफ्रा आर्चर मुंबई इंडियन

एमएस धोनीची 7 नंबरची जर्सी होणार निवृत्त
सनरायझर्स हैदराबाद संघाला मोठा झटका
बीसीसीआयचा  ऋषभ पंतच्या कमबॅकसाठी ग्रीन सिग्नल

इंग्लंड क्रिकेट संघाला एक मोठा धक्का बसला आहे. इंग्लंड संघाला जोफ्रा आर्चरच्या रूपाने धक्का बसला आहे. आयपीएल 2023 मध्ये जोफ्रा आर्चर मुंबई इंडियन्सचा भाग होता, परंतु दुखापतीमुळे त्याला आयपीएलमधून बाहेर पडावे लागले. आता तो 2023 च्या ऍशेस मालिकेतही खेळताना दिसणार नाही. जोफ्रा पुन्हा एकदा स्ट्रेस फ्रॅक्चरच्या समस्येशी झुंजत आहे.
जोफ्रा आर्चरच्या दुखापतीबाबत, इंग्लंड क्रिकेट बोर्डाचे (ईसीबी) व्यवस्थापकीय संचालक रॉब की यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे की, जोफ्रा आर्चरसाठी ही वेळ त्रासदायक आणि निराशाजनक आहे. जोफ्रा बर्याच दिवसांनी परत आल्याने तो सतत बरा होण्याच्या दिशेने वाटचाल करत होता. पण कोपराच्या दुखापतीने तो पुन्हा एकदा काही काळासाठी बाहेर झाला आहे.
रॉब की पुढे म्हणाले की, जोफ्राने लवकर परतावे अशी आमची इच्छा आहे. मला आशा आहे की आम्ही जोफ्राला इंग्लंडच्या जर्सीमध्ये पुन्हा मैदानावर सर्व फॉरमॅटमध्ये बघू, जरी थोडा वेळ लागला तरी. कोपरच्या दुखापतीमुळे आर्चर आयपीएल अर्धवट सोडून मायदेशी परतला होता, कारण त्याला खेळताना खूप त्रास होत होता. जवळजवळ 2 वर्षे स्ट्रेस फ्रॅक्चरशी झुंज दिल्यानंतर जोफ्रा आर्चर डिसेंबर 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतला. जोफ्रा आर्चरने वारंवार दुखापतींमुळे 2021 पासून इंग्लंडसाठी एकही कसोटी सामना खेळलेला नाही. जोफ्रा आर्चरला आता इंग्लंड आणि ससेक्स संघांच्या वैद्यकीय कर्मचार्‍यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार आहे. या वर्षाच्या अखेरीस भारतात खेळल्या जाणार्‍या एकदिवसीय विश्‍वचषकापूर्वी जोफ्रा पूर्णपणे तंदुरुस्त होईल, अशी इंग्लंड क्रिकेट संघाला आशा आहे.

COMMENTS