Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

५३ वर्षीय नराधमाचा ८ वर्षीय मुलीवर अत्याचार

मुंबई प्रतिनिधी - मुंबई पोलिसांनी जोगेश्वरी परिसरातून एका 53 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्यावर आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार के

येणार्‍या कुठल्याही निवडणुकीत घरचा उमेदवार देणार नाही-आ.संदीप क्षीरसागर
पुणे- मुंबई द्रुतगती महामार्गावर चौथी मार्गिका करण्याबाबत विचार
कर्नाटकात शिवरायांच्या पुतळ्याला काँग्रेसचा विरोध

मुंबई प्रतिनिधी – मुंबई पोलिसांनी जोगेश्वरी परिसरातून एका 53 वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. त्याच्यावर आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपी आणि पीडिता एकाच इमारतीमध्ये राहतात. मुलगी आणि आई दोघीच राहतात. मुलीची आई कामाला जाते. त्यामुळे मुलीच्या देखभालीसाठी कोणी नसल्याने ती मुलीला आरोपीच्या घरी सोडत असे. आरोपी आणि पीडिता व आई यांच्यात कौटुंबीक संबंध होते. दरम्यान, मोठ्या विश्वासाने ती मुलीला त्याच्याकडे सडून जात होती. मात्र, कुंपणानेच शेत खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. एके दिवशी पीडितेने आईला घडला प्रकार सांगितला. त्यानंतर आईने पोलिसांत जाऊन तक्रार दिली. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपी विरोधात आयपीसी आणि पॉक्सो कायद्याच्या कलम 376 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे.

COMMENTS