Homeताज्या बातम्यादेश

चॉकलेट घशात अडकून 4 वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू

लहान मुलांना चॉकलेट व टॉफी खूप आवडतात. मात्र कोणी कल्पनाही केली नसेल की, चॉकलेटही मुलाचा जीव घेऊ शकते. मात्र अशीच एक घटना गौतमबुद्धनगर जिल्ह्याती

बांधकाम सुरू असताना लिफ्ट कोसळली; ४ कामगारांचा दुर्दैवी मृत्यू
तरुणांनी संस्कृती जोपासण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे ः निवृत्ती महाराज देशमुख
या गावातील वाळुमाफिया, महसुल व पोलीस प्रशासनाच्या संगनमताने होतेय वाळू तस्करी | LOKNews24

लहान मुलांना चॉकलेट व टॉफी खूप आवडतात. मात्र कोणी कल्पनाही केली नसेल की, चॉकलेटही मुलाचा जीव घेऊ शकते. मात्र अशीच एक घटना गौतमबुद्धनगर जिल्ह्यातील कस्बा रबूपुरा येथे घडली आहे. येथे टॉफी खात असलेल्या चार वर्षीय मुलाच्या घशात ही टॉफी अडकली. यामुळे मुलाचा श्वास कोंडला व त्यातच याचा मृत्यू झाला. मुलाचा डोळ्यासमोर अचानक मृत्यू झाल्याने कुटूंबीयांनी आक्रोश केला. सांगितले जात आहे की, रबपुरा येथील मोहल्ला शांतिनगर येथे ही घटना घडली. येथील रहिवाशी शाहरुख यांचा ४ वर्षाचा मुलगा सान्याल दुपारच्या सुमारास दुकानातून टॉफी खेरदी करून खात होता. दरम्यान टॉफी त्याच्या गळ्यात जाऊन अडकली. यामुळे मुलाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. कुटूंबीयांनी त्यांच्या गळ्यात अडकलेली टॉफी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र टॉफी श्वास नलिकेत अडकल्याने बाहेर निघत नव्हती. त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र मुलाची गंभीर स्थिती पाहून डॉक्टरने त्याला बुलंदशहर रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. मात्र रस्त्यातच मुलाने जगाचा निरोप घेतला. मुलाच्या अचानक मृत्यूने कुटूंबीयांनी आक्रोश केला.

COMMENTS