कराड / प्रतिनिधी : कराड-विटा मार्गावरील ओगलेवाडी येथील डुबलवस्ती-पाटणकर मळा येथे ऊसाला आग लागल्याची घटना घडली. रेल्वे स्टेशन रोडजवळ दुपारी लागलेल
कराड / प्रतिनिधी : कराड-विटा मार्गावरील ओगलेवाडी येथील डुबलवस्ती-पाटणकर मळा येथे ऊसाला आग लागल्याची घटना घडली. रेल्वे स्टेशन रोडजवळ दुपारी लागलेल्या आगीत 25 ते 30 एकर ऊस जळाला. या आगीचे कारण स्पष्ट झाले नसून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, कराड तालुक्यातील मलकापूर येथे गेल्या आठवड्यात परिसरात 20 एकर ऊस जळून खाक झाला होता. त्यानंतर आता ओगलेवाडी रेल्वे स्थानकाजवळ ऊसाच्या शेतातून धुराचे लोट दिसू लागले होते. धुराच्या दिशेने लोकांनी धाव घेतली. तेंव्हा ऊस शेतीला आग लागल्याचे दिसून आले.
शेतात असलेल्या शेतकर्यांनी कराड नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाला पाचारण केले. तोपर्यंत शेतकर्यांनी बोअरींग व शेतातील मोटरी चालू करून पाईने आगीवर पाणी मारले. परंतू वारा प्रचंड वेगाने असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते. या आगीमुळे शेतकर्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. कराड तालुक्यात गेल्या आठ दिवसात 50 एकरातील ऊस जळाला आहे.
COMMENTS