बुलढाणा प्रतिनिधी- उघड्यावर शौचासाठी बसलेल्या 10 वर्षाच्या चिमुकल्यावर रस्त्यावरील मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या
बुलढाणा प्रतिनिधी– उघड्यावर शौचासाठी बसलेल्या 10 वर्षाच्या चिमुकल्यावर रस्त्यावरील मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. या हल्ल्यामध्ये गंभीर जखमी झालेल्या चिमुरड्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बुलडाणा शहरातील इंदिरानगर परिसरामध्ये ही घटना घडली. मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या 10 वर्षांच्या चिमुकल्याचं नाव इर्शाद शेख असं आहे. या घटनेनंतर आता कुत्र्यांच्या हल्ल्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे. मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात आली आहे.

COMMENTS