Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातभाई कॉलेजच्या गुणवंतांचा सन्मान

कोपरगाव शहर ः फेब्रुवारी मार्च 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षे

हरियाणा अजिंक्य ; महाराष्ट्राने पटकावले रजत पदक
समृद्धी महामार्गावर लुटमार करणारी आंतरजिल्हा टोळी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई
जो निर्णय घ्यायचा तो चोंडीत अहिल्याचरणी घ्या : बाळासाहेब दोडतले

कोपरगाव शहर ः फेब्रुवारी मार्च 2024 मध्ये महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेत कोपरगाव तालुक्यातील कमलाताई बाळासाहेब सातभाई तांत्रिक ज्युनिअर कॉलेज कासलीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा आमदार आशुतोष काळे यांच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्यात गौरव करण्यात आला. याप्रसंगी प्रसिद्ध सेने अभिनेते प्रसाद ओक यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या गुणगौरव सोहळ्यात सातभाई तांत्रिक ज्युनिअर कॉलेज कासलीचे प्रथम क्रमांक क्रमांकाने उत्तीर्ण झालेली सायली दुशिंग, द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली पूजा जाधव व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेला मयूर काळे या गुणवंत विद्यार्थ्यांचा आमदार आशुतोष काळे यांनी सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करत त्यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS