Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ग्रामीण भागात अंधश्रद्धेतून जादूटोणा व भानामती प्रकारात वाढ

देवळाली प्रवरा ः  अंधश्रद्धेतून जादूटोणा व भानामती, अघोरी विद्या केल्या जात असल्याचे प्रकार ग्रामिण भागात दिवसेंदिवस वाढत आहे. असाच प्रकार राहुरी

कोल्हे साखर कारखान्याचे वतीने साखर आयुक्तांचा सत्कार
विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी करावा
वोट बँक वाचवण्यासाठी शेतकर्‍यांचा बळी ः अजित नवले

देवळाली प्रवरा ः  अंधश्रद्धेतून जादूटोणा व भानामती, अघोरी विद्या केल्या जात असल्याचे प्रकार ग्रामिण भागात दिवसेंदिवस वाढत आहे. असाच प्रकार राहुरी तालुक्यातील वाघाचा आखाडा येथील स्मशान भुमीत घडला. रात्रीच्या वेळी लिंबू, टाचण्या, कोहळ्याचे फळ आदी वस्तूंचा उतारा टाकल्याने परिसरातील ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.
            याबाबत समजलेली माहिती अशी, गुरूवार दि. 6 जून 2024 रोजी आमावस्या असल्याने अज्ञात स्थळी रात्रीच्या सुमारास पुजा, मंत्र व जादूटोणा करून दि. 7 जून 2024 रोजी दुपारी आमावस्येच्या उत्तरार्धात एका अज्ञात विकृत मांत्रिकाने वाघाचा आखाडा येथील स्मशान भुमित लिबं, टाचण्या, वेगवेगळ्या रंगाच्या कापडी बाहूल्या, कापलेले कोहळ्याचे फळ, बेल, नारळ, अंडी, काळे कापड, पिठाचे पुतळे आदी वस्तूंवर हळद, कुंकवाचे पाणी टाकून हा उतारा आणून टाकला. हा प्रकार परिसरातील ग्रामस्थांच्या लक्षात आल्याने हा उतारा पाहण्यासाठी त्यांनी गर्दी केली. तर काहींनी घाबरून तेथून काढता पाय घेतला. ग्रामिण भागात अजूनही जादूटोणा, भानमती सारखे प्रकार सर्रास सुरू आहे. काही भागात भोंदूगीरी करणारांनी तर एखाद्या देवाचा भक्त असल्याचे सांगून त्याच मंदिरात अंधश्रद्धेचा बाजार मांडला आहे. कौटुंबिक कलह, व्यसनाधिन, लग्न होत नसलेले तरूण किंवा तरूणी या अंधश्रद्धेला बळी पडत असून हे भोंदू बाबा त्यांचा गैरफायदा घेऊन आर्थिक लूट करीत आहे. यासाठी पुन्हा नव्याने अंधश्रद्धा निर्मुलनाची चळवळ उभी राहणे गरजेचे आहे. पोलीस प्रशासनाने झालेल्या प्रकाराची चौकशी करून अशा विकृत ढोंगी बाबांना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी प्रत्यक्षदर्शी गावचे उपसरपंच प्रशांत सप्रे, आदिनाथ तनपुरे, धनंजय सप्रे, किशोर दौंड, मधुकर धसाळ अण्णासाहेब धसाळ, दत्तात्रय पेरणे आदींसह परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.

COMMENTS