Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देशभरात भाजपला उतरती कळा ः खा. शरद पवार

पुणे ः देशामध्ये भाजपच्या सत्तेला उतरती कळा लागली असून, त्याचे पडसाद लोकसभा निवडणुकीतून दिसून आले. केंद्रातील एनडीए सरकारला जर तेलगु देसम पक्ष आण

झोपडपट्टीत राहणाऱ्या प्रत्येकाला घर देण्याचे उद्दिष्ट ठेवा – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची बांधकाम व्यावसायिकांना सूचना
पत्नीशी वाद झाल्याने पतीने २ महिन्याच्या मुलीला दिले विहिरीत फेकून | LokNews24
शेतपिकांच्या नुकसानीकरिता ३६५ कोटी ६७ लाख रूपये मंजूर; ‘असे’ होणार मदतीचे वाटप

पुणे ः देशामध्ये भाजपच्या सत्तेला उतरती कळा लागली असून, त्याचे पडसाद लोकसभा निवडणुकीतून दिसून आले. केंद्रातील एनडीए सरकारला जर तेलगु देसम पक्ष आणि आंध्रप्रदेशच्या जनतेने स्वीकारले नसते तर देशात वेगळे चित्र बघायला मिळाले असते, तरीदेखील लोकसभा निवडणुकांच्या निकालावरून सत्ताधारी भाजपच्या कारकीर्दीला उतरती कळा लागल्याची टीका राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 25 व्या वर्धापनदिननिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी बोलतांना शरद पवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीचा निकाल बघितल्यास यंदा 5 वर्षांपूर्वी झालेल्या मतदानात अणि आत्ता फार मोठा बदल झाला आहे. संसदेतील सत्ताधारी यांची भूमिका पाहता त्यांच्या कारकिर्दीस उतरती कळा लागली आहे. त्यांची सदस्य संख्या कमी झाली. तेलगू देसम व आंध्रप्रदेशातून त्यांना मदत झाली नसती, तर आज चित्र वेगळे असते. सत्तेचे विकेंद्रीकरण न करता सत्ताधार्‍यांनाी 5 वर्षे मनमानी कारभार केला. देशात सामान्य माणूस हा तुमचा, माझ्यापेक्षा अधिक शहाणा आहे, असे ते म्हणाले. आजचा दिवस आनंदाचा असून सर्वांनी मिळून एक संघटना उभी केली. या संघटनेनेत मागील 25 वर्षांत नवीन इतिहास निर्माण करण्याचे काम केले आहे. अनेक गावामधून ज्यांच्या घरात सत्तेची, राजकारणाची पार्श्‍वभूमी नाही ते सामान्य माणूस राजकारणात आले. संसदीय पध्दत असली तरी आपण करत असलेले प्रयत्न सामान्य माणूस पाहून जागृत असतो. हा पक्ष आणखी मजबूत करावी. विधानसभा निवडणुक लवकरच होणार असून त्याचा निकाल लागल्या नंतर महाराष्ट्राची सत्ता तुम्हा लोकांच्या हातात आहे, ही भूमिका आपण पटवून देऊ. सत्तेचा उपयोग हा सामान्य व्यक्ती पर्यंत कसा होईल याचा प्रयत्न एकत्रित करावा, असे ते म्हणाले. यावेळी विश्‍वंभर चौधरी यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, निर्भय बनोच्या माध्यमातून 2 महिने राज्यभरात विविध ठिकाणी आम्ही सभा घेऊन वस्तुस्थितीची मांडणी लोकांंसमोर केली. कधी कोणाला वाटले नव्हते आपल्याला आपल्याच देशात आपलंच संविधान वाचविण्यासाठी रस्त्यावर उतरावे लागले असे चौधरी यावेळी म्हणाले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, सामाजिक कार्यकर्ते विश्‍वंभर चौधरी, माजी खासदार वंदना चव्हाण, माजी आमदार जयदेव गायकवाड, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते अंकुश काकडे उपस्थित होते.

COMMENTS