Homeताज्या बातम्यादेश

मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर अतिरेक्यांचा हल्ला

इम्फाळ ः मणिपुरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांच्या सुरक्षा ताफ्यावर सोमवारी सशस्त्र अतिरेक्यांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात मुख्यमंत्री बीर

सोनिया गांधींची प्रकृती बिघडली
चोपडा येथील लक्ष्मी ज्वेलर्स दुकान फोडून तीन लाखाचे चांदीचे दागिने चोरीला 
अमृतपाल सिंग लवकरच शरण येऊ शकतो

इम्फाळ ः मणिपुरचे मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांच्या सुरक्षा ताफ्यावर सोमवारी सशस्त्र अतिरेक्यांनी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात मुख्यमंत्री बीरेन सिंह थोडक्यात बचावले असून, यात दोन जवान जखमी झाले आहे.
यासंदर्भात सविस्तर माहिती अशी की, जिरीबाम येथे एकाची हत्या झाल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात पोलिस चौकीसह अनेकांची घरे जाळून टाकली होती. या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री जिरीबामचा दौरा करणार होते. या दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर अतिरिक्त सुरक्षा पथक पाहणीसाठी जिरीबामला निघाले असताना दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. सुरक्षा कर्मचार्‍यांच्या ताफ्यावर अतिरेक्यांकडून अनेक गोळ्या झाडण्यात आल्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. राष्ट्रीय महामार्ग-53 वर कोटलेन गावाजवळ अजूनही गोळीबार सुरू आहे. दरम्यान या हल्ल्यात 2 सुरक्षा जवान जखमी झाले आहेत. त्यांना इंफाळला नेण्यात आले आहे. जिरीबाम येथे मागील 2 दिवसांपासून हिंसाचार सुरु आहे. यामुळे तिथे तणावपूर्ण स्थिती आहे. तेथील स्थितीचा आढावा घेण्यासाठीच मुख्यमंत्री एन बीरेन सिंह जिरीबाम दौर्‍यावर जाणार होते. तिथे हिंसाचारात 70 घरे, काही सरकारी कार्यालये जाळण्यात आली आहेत. यामुळे शेकडो लोकांनी पलायन केले आहे. प्रदेशात वाढलेल्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर हा हल्ला झाला आहे. काही आठवड्यांपासून बेपत्ता असलेल्या 59 वर्षीय मेईती शेतकरी सोइबाम सरतकुमार सिंग यांचा मृतदेह सापडल्यानंतर 6 जून रोजी हिंसाचारात वाढ झाली. सरतकुमार सिंग यांचा मृतदेह आढळल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. सुरक्षेसाठी वाढीव उपाययोजना आणि संरक्षणासाठी स्वत:ला सशस्त्र करण्याचा अधिकार मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे. परिस्थिती झपाट्याने बिघडली आणि शेजारच्या आसामपर्यंत याचे लोण गेले. जिथे विविध जातीय पार्श्‍वभूमीतील अंदाजे 600 व्यक्तींनी लखीपूर, कचार जिल्ह्यात आश्रय घेतला आहे. जिरीबाम हे राज्याची राजधानी इंफाळपासून 220 किमी अंतरावर आसामच्या सीमेला लागून असलेला प्रदेश आहे. जो महत्त्वाच्या राष्ट्रीय महामार्ग-37 ने जातो.

COMMENTS