Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बोगस कांदा अनुदान प्रकरणी सोळा जणांवर गुन्हा दाखल

श्रीगोंदा शहर : श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत 1 कोटी 88 लाख 47 हजार 524 रुपये इतक्या रकमेच्या कांदा अनुदानाचा बोगस प्रस्ताव तयार करुन आणि त

नेव्ही भरती नियुक्तीचे पत्र निघाले बनावट…एकास अटक
रघुनाथ अभंग यांचे निधन
अश्‍लील मजकुराच्या चिठ्ठ्या घरात टाकून महिलेचा विनयभंग

श्रीगोंदा शहर : श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीत 1 कोटी 88 लाख 47 हजार 524 रुपये इतक्या रकमेच्या कांदा अनुदानाचा बोगस प्रस्ताव तयार करुन आणि त्यासंबंधित निधीचा गैरव्यवहार करुन शासनाची फसवणूक केल्याच्या प्रकरणी श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आणि आडते व व्यापारी अशा 16 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1 मे 2023 ते 1 जुलै 2023 दरम्यान हे प्रकरण घडले. आरोपींमध्ये सचिव दिलीप लक्ष्मण डेबरे (रा. वेळु, ता. श्रीगोंदा), आडते-व्यापारी हवालदार ट्रेडींग कंपनी व त्यांचे दिवाणजी, महादेव लोखंडे (रा. चिंभळे, ता. श्रीगोंदा), सत्यम ट्रेडर्स, राज ट्रेडर्स, घनश्याम प्रकाश चव्हाण (रा. श्रीगोंदा), शरद झुंबर होले (रा. होलेवस्ती, श्रीगोंदा), संदीप श्रीरंग शिंदे (रा. आढळगाव), राजू भानुदास सातव (रा. श्रीगोंदा), सोपान नारायण सिदनकर (रा. श्रीगोंदा), दत्तात्रय किसन राऊत (रा. शेडगाव), सिदनकर झुंबर किसन (रा. श्रीगोंदा), शेंडगे संतोष दिलीप (रा. श्रीगोंदा), भाऊ मारुती कोथिंबीरे (रा. साळवण देवी रोड), महेश सुरेश मडके (रा. लोणीव्यंकनाथ, मडकेवाडी) आणि परशुराम गोविंद सोनवणे (रा. टाकळी कडेवळीत) यांचा समावेश आहे. फिर्यादी राजेंद्र फकिरा निकम, जिल्हा विशेष लेखापरीक्षक वर्ग 1 सहकारी संस्था, अहमदनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपींवर भारतीय दंड विधान कलम 420 (फसवणूक), 465 (कागदपत्रांची बनावट), 468 (फसवणूक करण्याच्या उद्देशाने कागदपत्रांची बनावट), 471 (बनावट कागदपत्रांचा वापर), 477 (अ) (लेखापरीक्षणाची फसवणूक) आणि 34 (सामान्य हेतू) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक ज्ञानेश्‍वर भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल मुकेशकुमार बडे यांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रभाकर निकम करीत आहेत.

COMMENTS