Homeताज्या बातम्यादेश

भाजप नापास ; ‘एनडीए’ मात्र पास !

नवी दिल्ली ः देशामध्ये सात टप्प्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी हाती आले असून, यामध्ये एनडीएची मोठी घसरण झाली असली तरी, एनडीएने आपल

भ्रष्टाचाराचे धार्मिक संदर्भ
जिव्हाळाच्या दांडिया नाईटमध्ये रंगला दांडिया व गरबा नृत्य
अजय फटांगरे यांनी कर्तृत्व आणि नेतृत्वातून नावलौकिक मिळवला : ना. थोरात

नवी दिल्ली ः देशामध्ये सात टप्प्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी हाती आले असून, यामध्ये एनडीएची मोठी घसरण झाली असली तरी, एनडीएने आपली सत्ता राखल्याचे दिसून येत आहे. मात्र भाजप एकहाती सत्ता मिळवण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत विजयासाठी 273 खासदारांची संख्या असतांना भाजपने जवळपास 20 जागांवर विजयी आघाडी घेतल्यामुळे भाजप एकहाती सत्ता मिळवण्यात अपयशी ठरली आहे. मात्र मित्रपक्षांच्या वतीने भाजप सत्ता स्थापन करण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काँगे्रससह इंडिया आघाडीने जोरदार मुंसडी मारत भाजपसह एनडीएला चांगलीच कडवी झुंज देत जोरदार मुंसडी मारल्यामुळे भाजपच्या गोटात शांतता पसरली होती. इंडिया आघाडीने 230 च्या जवळपास संख्येवर आघाडी घेतल्यामुळे इंडिया आघाडीला सत्ता स्थापनेसाठी किमान 50 खासदारांची कमी पडतांना दिसून येत आहे. शिवाय इंडिया आघाडीकडून नितीश कुमारांना आपल्या गोटात घेण्यासाठी हालचाली सुरू होत्या, मात्र नितीशकुमार यांनी आपण भाजपसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. निकालाच्या वेळी एक वेळ अशी होती की, इंडिया आघाडी बहुमत मिळवेल की काय, असे चिन्ह दिसून येत होते, त्यामुळे भाजपच्या तोंडचे पाणी पळाले होते. मात्र अखेरच्या टप्प्यात एनडीएने काठावरचे बहुमत मिळवत सत्ता कायम राखल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेश राज्याचा गड जो पक्ष राखतो, तो पक्ष सत्ता मिळवतो असा अंदाज असतो. मात्र यंदा उत्तरप्रदेश भाजपच्या हातून निसटतांना दिसून येत आहे. उत्तरप्रदेशात अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षाने 37 जागा जिंकत भाजपच्या तोंडचे पाणी पळवले आहेत.

पंतप्रधान मोदी केवळ दीड लाख मतांनी विजयी – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघात तिसर्‍यांदा विजय मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांचा दीड लाख मतांनी पराभव केला आहे. गेल्या दोन निवडणुकांतील विजयाची तुलना केली तर यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या मताधिक्यात घट झाली आहे. गेल्या निवडणुकीत मिळालेल्या मतांपेक्षा यावेळी मोदींना कमी मते मिळाली आहेत. मागील निवडणुकीत पंतप्रधान मोदींना 6 लाख 74 हजार 664 मते मिळाली होती. या निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांना 6 लाख 11 हजार 439 मते मिळू शकली. तर काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांना यावेळी 4 लाख 59 हजार 084 मते मिळाली आहेत. पंतप्रधान मोदी यांनी यावेळी अजय राय यांचा 1 लाख 52 हजार 355 मतांनी पराभव केला आहे. एका क्षणी पंतप्रधान मोदी यांना अजय राय यांनी पिछाडीवर टाकले.

देशातील पक्षीय बलाबल
भाजप -244
काँगे्रस-98
एनडीए- 297
इंडिया आघाडी -228
————————
महाराष्ट्रातील चित्र
काँगे्रस ः12
भाजप ः 11
ठाकरे गट ः 10
शरद पवार गट ः 7
शिवसेना शिंदे ः 6
अजित पवार गट ः1

महाराष्ट्रातील विजयी उमेदवार
1-नंदूरबार ः गोवाल पाडवी – काँगे्रस
2- धुळे- डॉ. शोभा बच्छाव काँगे्रस आघाडीवर
3- जळगाव- स्मिता वाघ भाजप
4- रावेर -रक्षा खडसे भाजप
5-बुलडाणा ः प्रतापराव जाधव शिंदे गट
6-अकोला अनुप धोत्रे भाजप
7-अमरावती- बळवंत वानखेडे- काँगे्रस
8-वर्धा- अमर काळे शरद पवार गट
9- रामटेक श्यामकुमार बर्वे काँगे्रस आघाडीवर
10- नागपूर- नितीन गडकरी भाजप
11- भंडारा-गोंदिया डॉ. प्रशांत पडोळे काँगे्रस आघाडीवर
12-गडचिरोली-चिमूर डॉ. किरसन नामदेव काँगे्रस
13-चंद्रपूर ः प्रतीभा धानोरकर काँगे्रस
14-यवतमाळ-वाशिम ः संजय देशमुख काँगे्रस
15 हिंगोली ः नागेश पाटील आष्टीकर ठाकरे गट
16- नांदेड ः वसंतराव चव्हाण काँगे्रस आघाडीवर
17-परभणी ः संजय जाधव ठाकरे गट
18 जालना ः डॉ. कल्याण काळे काँगे्रस
19-छ. संभाजीनगर ः संदीपान भुमरे शिंदे गट
20-दिंडोरी ः भास्करराव भगरे शरद पवार गट
21- नाशिक राजाभाऊ वाजे ठाकरे गट
22-पालघर ः हेमंत सावरा- भाजप उमेदवार
23-भिंवडी ः सुरेश म्हाडे शरद पवार गट आघाडी
24-कल्याण ः डॉ. श्रीकांत शिंदे ः शिंदे गट
25-ठाणे ः नरेश म्हस्के -शिंदे गट
26-मुंबई उत्तर ः पियुष गोयल भाजप
27-मुंबई उत्तर पश्‍चिम ः अमोल कीर्तीकर ठाकरे गट
28-मुंबई ईशान्य ः संजय दीना पाटील ठाकरे गट
29-मुंबई उत्तर मध्य ः वर्षा गायकवाड काँगे्रस
30-मुंबई दक्षिण मध्य -अनिल देसाई -ठाकरे गट
31-मुंबई दक्षिण ः अरविंद सावंत ठाकरे गट
32-रायगड-सुनील तटकरे- अजित पवार गट
33-मावळ ः श्रीरंग बारणे  शिंदे गट
34-पुणे- मुरलीधर मोहोळ-भाजप
35-बारामती सुप्रिया सुळे पवार गट
36-शिरूर ः डॉ. अमोल कोल्हे -शरद पवार गट
37-अहमदनगर ः नीलेश लंके शरद पवार गट
38- शिर्डी ः भाऊसाहेब वाकचौरे ः ठाकरे गट
39-बीड-
40-धाराशिव ः ओमराजे निंबाळकर ठाकरे गट
41-लातूर- शिवाजीराव काळगे आघाडीवर
42- सोलापूर प्रणिती शिंदे काँगे्रस
43-माढा-धैर्यशिल मोहिते शरद पवार गट
44-सांगली ः विशाल पाटील अपक्ष
45- सातारा- उदयनराजे भोसले
46-रत्नागिरी-सिंधुदुर्ग-नारायण राणे
47-कोल्हापूर ः शाहू महाराज काँगे्रस
48- हातकणंगले ः धैर्यशील माने शिंदे गट आघाडीवर

COMMENTS