Homeताज्या बातम्यादेश

लोकसभा निवडणुकीचा आज ‘महानिकाल’

एनडीएविरूद्ध महाविकास आघाडीचे भवितव्य ठरणार

नवी दिल्ली ः सर्वाधिक मतदार असलेल्या भारत देशामध्ये 18 व्या लोकसभेसाठी 7 टप्प्यात मतदान पार पडले असून, या लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर

कटरीनाला सासूबाईंची विशेष काळजी
महिलेच्या पोटात आढळला सुई-धागा
ग्रामपंचायत निवडणूकीस यात्रा कालावधीत चोख पोलीस बंदोबस्त ठेवा : पालकमंत्री

नवी दिल्ली ः सर्वाधिक मतदार असलेल्या भारत देशामध्ये 18 व्या लोकसभेसाठी 7 टप्प्यात मतदान पार पडले असून, या लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर होणार आहे. सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरूवात होणार असून, केंद्रीय निवडणूक आयोगाने या निकालासाठी जय्यत तयारी केली आहे. तसेच या निकालातून एनडीए आणि इंडिया आघाडीचे भवितव्य ठरणार असून, कोण सत्तेत येते ते पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीच्या काही तास अगोदर निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली आहे. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यावर्षी 64 कोटी लोकांनी मतदान केल्याचे सांगितले आहे. तसेच यावर्षी 31.4 कोटी महिला मतदारांनी मतदानाचा हक्का बजावला असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. राजीव कुमार म्हणाले की, आतापर्यंत आम्ही 100 प्रेस नोट काढल्या. 31.4 कोटी महिला मतदारांनी मतदान केलं आहे. उद्या होणार्‍या मतमोजणीच्या पार्श्‍वभूमीवर आज निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडली आहे. यावेळी निवडणूक आयोगाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण झाल्याचं देखील राजीव कुमार यांनी सांगितले आहे.
यावेळी राजीव कुमार यांनी उभे राहून सगळ्या मतदारांचे मानले आभार, महिला मतदारांचे आभार मानले. राजीव कुमार म्हणाले की, या लोकसभा निवडणुकीत  स्त्रियांचा सन्मान राखण्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न केले. एकाही राजकीय नेत्याकडून प्रचारात स्त्रियांविषयी अपशब्द निघणार नाहीत याची काळजी आम्ही घेतली. अशी प्रकरणे समोर आली तेव्हा आम्ही त्यांना सक्त ताकीद दिली. तसेच महिलांच्या विरोधात कुठलाही चुकीचा शब्द जाऊ नये म्हणून आम्ही काळजी घेतली. आमच्या मनात स्त्रियांविषयी आदर असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

31 कोटी महिलांचे मत ठरणार निर्णायक – यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वाधिक 31.4 कोटी महिलांनी मतदान केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महिलांचे मत निर्णायक ठरणार आहे. भाजप आणि काँगे्रस या पक्षांनी आपल्या पक्षांच्या जाहिरनाम्यात महिलांना विशेष स्थान देत विविध योजनांचे आश्‍वासन देण्यात आले होते. काँगे्रसकडून महिलांना लखपती बनवण्याची योजना आणण्यात आली होती. तर भाजपकडून महिला सक्षमीकरणाचा नारा देण्यात आला होता. त्यामुळे महिला नेमका कुणाला कौल देतात, त्याचा फैसला आज मंगळवारी होणार आहे, मात्र महिलांचे मतदान या निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे.

अशी असेल मतमोजणीची प्रक्रिया – लोकसभेतील 543 जागांसाठी मतदान घेण्यात आले असून, त्याची मतमोजणी उद्या मंगळवारी होत आहे. यासाठी निवडणूक आयोगाने तयारी पूर्ण केली असून, या मतमोजणीसाठी देशभरात 10 लाख 50 बूथ आहेत, एका हॉलमध्ये चौदा टेबल असतील. तसेच 8 हजारांहून अधिक उमेदवार आहेत, त्यांचे पोलिंग एजंटही मतमोजणीवेळी हजर असतील. यासोबतच  निरीक्षक, सूक्ष्म निरीक्षकही त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. 70 ते 80 लाख लोक या मतमोजणी कार्यक्रमात सहभागी होणार आहे.सीसीटीव्ही कॅमेराच्या अंतर्गत, मतमोजणी केली जाणार आहे.

जिल्हाधिकार्‍यांना धमकावल्याची खोटी चर्चा – देशातील 150 जिल्हाधिकार्‍यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी धमकावल्याचा आरोप काँगे्रस नेते जयराम रमेश यांनी केला होता. यावर बोलतांना मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले की, 150 जिल्हाधिकार्‍यांशी बोलण्याची चर्चा खोटी आहे. आजकाल आरोप-प्रत्यारोपांचा जमाना जास्त आहे, गप्पांचा बाजार सुरू आहे, आरोप करणे मान्य आहे पण पुरावे आपल्याकडे असावेत ही अट असल्याचे देखील राजीवकुमार यावेळी म्हणाले.

COMMENTS