महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि सहकार उद्यमी यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक उत्पादनांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी 'कॉपशॉप वर्ल्ड` या पोर्टल अंतर्गत उत्पादकांना
कोपरगाव प्रतिनिधी – महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन आणि सहकार उद्यमी यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक उत्पादनांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी ‘कॉपशॉप वर्ल्ड` या पोर्टल अंतर्गत उत्पादकांना व्यवसाय वृद्धीसाठी सहकार्य करणार असून अमेझॉन, फ्लिपकार्ट पोर्टल सारखे कॉपशॉप वर्ल्ड सारखे पोर्टल सुरू करून त्यावरून स्थानिक व्यवसाय आणि उत्पादनांची माहिती उपलब्ध करून विक्री करण्यात येणार आहे त्यामुळे एक नवीन ऑनलाईन विक्रीची बाजारपेठ उपलब्ध होत असून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन व समता नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे यांनी केले.
समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्व.यशवंतराव चव्हाण सहकार सभागृहात कॉपशॉप वर्ल्ड पोर्टलची माहिती देण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने प्रमुख उपस्थितामध्ये ६ जून २०२१ रोजी बैठक आयोजित करण्यात आली.प्रसंगी ते बोलत होते. नाशिक, अहमदनगर,औरंगाबाद उत्पादकांचा ऑनलाईन पद्धतीने उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सहकार उद्यमीच्या अध्यक्षा सौ अंजलीताई पाटील यांनी ही अनमोल मार्गदर्शन केले त्या म्हणाल्या की, सहकार उद्यमी मार्फत महिला सक्षमीकरणासाठी आणि महिलांनी तयार केलेल्या स्थानिक बाजारपेठेला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळावा यासाठी विविध उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवत असतो यामुळे स्थानिक माला ला महत्त्व प्राप्त करून देण्यार आहोत त्यासाठी या उपक्रमात सर्वांनी एकत्र येऊन हा उपक्रम यशस्वी करूयात.
प्रसंगी कालांश उद्योग समूहाचे श्री रोहित काले यांनी या पोर्टल करिता लागणारे सर्व फोटोसेशन व डिझायनिंग मोफत करून देणार असल्याची घोषणा केली.या पोर्टल विषयी सविस्तर माहिती श्री दर्शन जोशी यांनी दिली.याबाबत अधिक माहितीसाठी कु.रेणुका मुन्शी यांच्याशी ९१५८२७६६८५ या क्रमांकाशी संपर्क साधावा.
तर अहिंसा हातमाग केंद्राच्या संचालिका सौ पूजा पापडीवाल ,श्री अशोक दरक, श्री महेंद्र विधाते ,सौ सविता विधाते, बंगाळ पेठा चे व्यवस्थापक श्री सुनील बंगाळ, श्री चंद्रशेखर देशमुख श्री अभंग आदींसह व्यवसायात आलेले अनुभव कथन करून ऑनलाईन पद्धतीने करण्यात येत असलेल्या मालाच्या विक्रीचे कौतुक केले येवला, राहता तालुक्यातील स्वतः उपस्थित राहून माहिती घेतली.या बैठकीचे सूत्रसंचालन आणि आभार कु रेणुका मुन्शी यांनी मानले
COMMENTS