कोपरगाव शहर ः कोपरगाव शहरातून वाहणार्या पवित्र अशा गोदावरी नदी किनारी जिथे कोणतेही शुभ कार्य करण्यास मुहूर्त लागत नाही असे पवित्र परम सद्गुरू शु
कोपरगाव शहर ः कोपरगाव शहरातून वाहणार्या पवित्र अशा गोदावरी नदी किनारी जिथे कोणतेही शुभ कार्य करण्यास मुहूर्त लागत नाही असे पवित्र परम सद्गुरू शुक्राचार्य महाराजांचे पुरातन मंदिर असून या मंदिराच्या गाभार्याचे नूतनीकरण व सुशोभीकरण करत महाराजांची मकरणा मार्बल पासून तयार केलेल्या आकर्षक अशा मूर्तीची प्राण प्रतिष्ठा लवकरच कॅप्टन सुरेश आव्हाड यांचे नाशिक येथील मित्र तसेच दानशूर भक्त प्रदीपशेठ राठी यांच्या देणगी रूपातील दानातून होणार आहे.
या विषयी अधिकची माहिती देण्यासाठी श्री कोपरगाव बेट देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड यांनी देवस्थानचे सर्व ट्रस्टी तसेच व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य यांची गुरुवार दि 30 मे रोजी बैठक घेऊन सर्व कामाची रूपरेषा कशी असेल कशा पद्धतीने काम होणार आहे आणि महाराजांची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कशा पद्धतीने करावयाचे आहे या संदर्भात माहिती दिली. तसेच या महान कामाचा श्री गणेशा मंदिराचे ट्रस्टी श्री व सौ एस एल कुलकर्णी तसेच व्यवस्थापन समितीचे सदस्य श्री व सौ दत्तात्रय सावंत यांच्या हस्ते विधिवत पूजा करत आज पासूनच सुरू झाला असल्याने या कालावधीमध्ये मंदिरात येणार्या भक्तांची थोड्याफार प्रमाणात गैरसोय होणार आहे त्याबद्दल मंदिर प्रशासन सर्व भक्तांची दिलगिरी व्यक्त करत असल्याचे अध्यक्ष आव्हाड यांनी सांगत भाविक भक्तांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. या प्रसंगी ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब आव्हाड, हेमंत पटवर्धन, मंदिर प्रमुख सचिन परदेशी, उपमंदिर प्रमुख प्रसाद पर्हे, मधुकर साखरे, विलास आव्हाड, विजयराव रोहम, आदिनाथ ढाकणे, बाळासाहेब गाडे, दिलीपराव सांगळे, राजेंद्र आव्हाड, सुजित वरखडे, भागचंद रुईकर, महेंद्र नाईकवाडे, संजय वडांगळे, मंदिराचे व्यवस्थापक राजाराम पावरा, मंदिराचे पुजारी जोशी गुरु, भनगे गुरु आदी उपस्थित होते.
COMMENTS