Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाण्याअभावी गणेश परिसरातील शेतकरी संकटात

धरणात पाणी असूनही 25 वर्षांपासून शेतकरी पाण्यापासून वंचित

राहाता ः गणेश परिसरातील शेतकर्‍यांना धरणात पाणी असूनही गेल्या 25 वर्षापासुन ज्यावेळेस गरज लागेल, त्यावेळी पाणी मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात

यंदा जायकवाडी धरणामध्ये पाण्याची मोठी तूट – इंजि. चकोर
मनोज जरांगे पाटील यांच्या आरक्षण लढ्याच्या यशानंतर पाथर्डी शहरासह तालुक्यात  जल्लोष
जलद गाडयांना पुणतांबा स्थानकावर थांबा मिळावा

राहाता ः गणेश परिसरातील शेतकर्‍यांना धरणात पाणी असूनही गेल्या 25 वर्षापासुन ज्यावेळेस गरज लागेल, त्यावेळी पाणी मिळत नसल्याने शेतकरी आर्थिक संकटात येवुन अत्यंत हालाखीची परिस्थिती झाल्याने शेतकर्‍यांमध्ये संतापाची भावना निर्मान झाली असून मुलांचे शिक्षण घरातील आजारपण, बँकेचे हप्ते, मुलाबाळांचे लग्न व कुटुंब चालवणेही अवघड झाले आहे. त्यामुळे मराठवाडा व विदर्भानंतर गणेश परिसरातही शेतकरी आत्महत्या करण्याच्या मानसिकतेत आहे.
10-12 कि.मी वर असलेला गावातुन भंडांरदर्‍याचा वाहनारा पाट बाराही महीने वाहतो. दुथडी भरुन वाहणार्‍या कॅनोल मुळे तेथील पिके बाराही महिने हिरवीगार असतात. तेथील शेतकरीही आमचे बांधवच आहेत त्यांच्याबद्दल आमच्या मनात राग नाही परंतु गणेश परिसरातील शेतक-यांवर नेहमी अन्याय होत आला आहे.  शेतीला वेळेवर पाणी न देता गणेश परिसरातील शेती उद्ध्वस्त कऱण्याचा नेहमी प्रयत्न राहीला आहे. रब्बी व खरिप हंगामातही जाणीवपुर्वक पिके जळाल्यावर धरणातुन पाणी सोडले जाते. यावर्षीही उन्हाळ्यात सुर्य आग ओकत असताना एप्रिल महिन्यात पाण सोडणे गरजेचे होते. शेतक-यांना किमान मे च्या पहिल्या आठवड्यात पिकांना पाणी मिळणे गरजेचे होते. परंतु आता उशीर पाणी तर सोडले व जुनच्या पहिल्या आठवड्यात गणेश परिसरात फक्त तीन दिवस चा-यांना पाणी मिळणार असल्याने शेतक-यांच्या तोंडाला फक्त पाने पुसली जाणार आहेत. उघड उघड ही शेतक-यांची फसवणूक आहे. गोदावरी कालव्यांतून पुरेसे पाणी मिळत नसल्याने गणेशपरिसरातील  शेती व शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. या परिसराचे वाळवंट झाले असुन बाजारपेठा ओस पडल्या आहेत. वर्षानुवर्षे शेतक-यांवर  होणा-या अन्यायामुळे संतापाची भावना निर्माण झाली आहे.  राहाता शहराचे वैभव लोप पावले. एकेकाळी येथे डोलणारे उस मळे व फळबागा मोडकळीस आल्या आहेत. पुढच्या पिढीला याठिकाणी चारी आणि पाट कसे होते हे फक्त फोटोमध्येच दाखवावे लागतील. उन्हाळ्यात आता पिण्याच्या पाण्याची मारमार सुरू झाली. जनावरे जगविण्यासाठी वैरणीची पिके घ्यायला देखील पाणी मिळत नाही. गोदावरी कालवे गंजले, गाळाने भरले आणि कोरडे पडले. शेजारी प्रवरा कालवे बारा महिने गच्च भरून वहातात. हिरवेगार उसमळे डोलत असतात. गोदावरी कालव्यांचे पात्र मात्र भेगाळलेले. शेती ओसाड अन उजाड झाली…उसाचे पिक नष्ट झाले तसे शेतकरी कंगाल झाले. राहात्याच्या बाजारपेठात शुकशूकाट झाला. शेतक-यांच्या डोक्यावरचे कर्ज फिटेना. जनावरांना हिरवा चारा मिळेना. पावसाळा संपला कि विहीरी आटू लागल्या. रब्बीची शाश्‍वती राहीली नाही. उन्हाळ्यात पाण्याचा भरोसा नाही. कालव्यातून पाणी वाहत नाही, चा-यांची दुरूस्ती गेल्या अनेक वर्षात झालेली नाही. पाणी गेले, गणेश परिसराचे वैभव गेले, गोदावरी कालवे कधी दूरूस्त होणार,वितरीकांची दुरूस्ती कोण करणार,हक्काचे पाणी कधी परत मिळणार,गोदावरी कालव्यातून उन्हाळ्यात पाणी मिळत नाही. कोरड्या विहीरींना पाझर फुटत नाही. अशी सर्व भिषण परिस्थीती झालेली असताना शेतक-यांना कोणी वालीच उरला नाही की काय असा प्रश्‍न सर्वसामान्य जनतेला पडत आहे.                                                                              

डॉ. पिपाडा यांनी वेधले उपमुख्यमंत्री फडणवीसांचे लक्ष – गणेश परिसरातील शेतकरी शेतीला पाणी नसल्याने देशोधडीला लागला असुन या परिसराचे वाळवंट झाले असुन शेतक-यांना कुटुंबाची उपजीविका करणेही अवघड झाले असुन गेल्या 25 वर्षापासुन धरणात पाणी असुनही पिके जळाल्यावर शेतीला पाणी दिले जाते. आता शेतकर्‍यांना पाणी मिळणार नसुन फक्त पाणी दिल्याचा देखावा करण्याकरीता तीन दिवसाकरीता चार्‍या सुटणार आहे. त्यामुळे गणेश परिसरातील शेतकर्‍यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असल्याचे पत्र आपण उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना दिले असल्याचे डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी सांगितले आहे.

COMMENTS