Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवनाथ महाराज काळे यांचे निधन

शेवगाव तालुका ः शेवगाव तालुक्यातील दहिगाव-ने येथील दध्नेश्‍वर शिवालयाचे मठाधिपती वारकरी संप्रदायाचे एक अभ्यासू व्यक्तिमत्व नवनाथ महाराज काळे यांच

सुमनबाई वाळुंज यांचे निधन
आ. आशुतोष काळेंनी सपत्नीक ढोल वाजवत दिला बाप्पाला निरोप
भिंगार शहराची ओळख असणारी ऐतिहासिक वेस पुन्हा बांधण्याची मागणी

शेवगाव तालुका ः शेवगाव तालुक्यातील दहिगाव-ने येथील दध्नेश्‍वर शिवालयाचे मठाधिपती वारकरी संप्रदायाचे एक अभ्यासू व्यक्तिमत्व नवनाथ महाराज काळे यांचे वृंदावन (उत्तरप्रदेश) या ठीकाणी देव दर्शनासाठी गेले असता दुःखात निधन झाले. त्याचे वय 42  वर्ष होते. अचानक झालेल्या दुःखात घटनेने परिसरातील भक्त परिवारामध्ये शोककळा पसरली आहे. ह. भ. प. गुरुदास नवनाथ महाराज काळे यांनी उत्तरप्रदेश येथील वृंदावन येथे भागवत कथा ज्ञानज्ञ सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमासाठी भक्त परिवारासह 21 तारखेला दहिगांव – ने येथून गेले होते. मंगळवारी रात्री  देवदर्शन घेऊन गांवाकडे येत असताना शारीरिक त्रास सुरु झाल्याने उपचारासाठी दवाखान्यात नेले असता डॉक्टरानी मृत घोषित केले . त्यांचा देह वृंदावन येथून उशिराने दहिगांव ने येथील दध्नेश्‍वर शिवालयात दाखल झाला. उदया गुरुवारी सकाळी 9 वा. देह दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. व त्यांचा वैकुंठ गमन, उत्तर अधिकारी दिक्षा सोहळा परिसरातील वारकरी संप्रदायातील संत महंत यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. दध्नेश्‍वर शिवालयाचे प्रमुख शांतीब्रह्म वै. संत कृष्णदेव महाराज काळे यांचे उत्तर अधिकारी शिष्य होते.कीर्तनाच्या व बालसंस्कार शिबिराच्या माध्यमातून समाजाला अध्यात्मिक मार्ग दाखवण्याचे त्यांनी काम केले. राज्यात शांतीब्रह्म वै. संत-कृष्णदेव महाराज काळे यांना माननारा मोठा भक्त परिवार आहे. त्यांच्या पश्‍चात उत्तर अधिकारी म्हणून नवनाथ महाराज काळे यांनी वारकरी संप्रदायात भक्तिमार्गातुन सेवा देण्याचे काम अखंड चालु ठेवत भक्तपरिवार मध्ये नावलौकिक मिळवला होता. त्यांची निधन वार्ता कळताच सर्व व्यापारी व ग्रामस्थांनी दहिगावने येथील मठावर गर्दी केली होती.

COMMENTS