Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रवरासंगम येथील विद्या कोरडे दहावीत प्रथम

नेवासाफाटा: नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथील श्री सिध्देश्‍वर इंग्लिश स्कूलची विद्यार्थीनी कु.विद्या अरुण कोरडे ही 94% गुण मिळवून विद्यालयात प

केडगाव एमआयडीसीतील टाकीला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली
एचआरसीटी माहिती लपवल्याने नगरमध्ये कोरोना रुग्ण वाढ
इंदोरीकर महाराजांविरोधातील खटला चालविण्याचा आदेश रद्द

नेवासाफाटा: नेवासा तालुक्यातील प्रवरासंगम येथील श्री सिध्देश्‍वर इंग्लिश स्कूलची विद्यार्थीनी कु.विद्या अरुण कोरडे ही 94% गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.कोणतेही क्लास न लावता शिक्षकांनी दिलेल्या नोट्सवर अध्ययन करून विद्या ने हे यश संपादन केले आहे.तिच्या यशाबद्दल गावकर्‍यांनी तिचा फेटा घालून सत्कार केला. कु.विद्या कोरडे हिच्या यशासाठी शाळेचे मुख्याध्यापक गायकवाड सर व सर्व शिक्षक व शिक्षिका यांचे मार्गदर्शन मिळाले आहे. कुठलेही खाजगी क्लास न लावता स्वतःच्या जिद्दीने व प्रयत्नाने तिने हे यश संपादन केले आहे. त्यामुळे तिचे सर्वांनी भरभरून कौतुक केले आहे. कु.विद्या हिला गायनाची आवड असून  श्री सिद्धेश्‍वर इंग्लिश स्कूल प्रवरासंगमची गाण कोकीळा, छोटी लता मंगेशकर म्हणून तिची संपूर्ण परीसरात तिची ओळख आहे. तिच्या या यशाबद्दल गावच्या वतीने सरपंच संदीप सुडके,माजी सरपंच सुनील बाकलीवाल,सोसायटीचे चेअरमन पांडुरंग काळे,शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील, बी. के. चव्हाण, व्यापारी रमेश ललवाणी, विद्याचे वडील अरुण कोरडे, आजोबा भास्कर कोरडे, अमोल कोरडे, अण्णा मुळे, शांतवन खंडागळे, महेश मते यांनी विद्या कोरडे हिचे सत्काराद्वारे अभिनंदन केले आहे.

COMMENTS