श्रीगोंदा शहर प्रतिनिधी: श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बालेवाडी, पुणे येथे 22 ते 26 मे दरम्यान राष्ट्रीय किकबॉक्सींग स्पर्धा संपन्न
श्रीगोंदा शहर प्रतिनिधी: श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल बालेवाडी, पुणे येथे 22 ते 26 मे दरम्यान राष्ट्रीय किकबॉक्सींग स्पर्धा संपन्न झाल्या. स्पर्धेमध्ये येथील संजय आनंदकर स्पोर्ट्स अकॅडमी च्या खेळाडूंनी 2 सुवर्ण, 1 रौप्य आणि 3 कांस्यपदके पटकावून घवघवीत यश संपादन केले. प्रज्वल ढवळे याने लाईट कॉन्टॅक्ट आणि पॉईंट फाईट या दोन्ही प्रकारांमध्ये सुवर्णपदक मिळवून सर्वोत्तम कामगिरी केली.
प्रणव रायकर याने रौप्यपदक पटकावले. तर सृष्टी काळे, शर्वरी गोलांडे आणि जय शेलार यांनी कांस्यपदके पटकावली.तसेच आरव कुलकर्णी, प्रतिक आमले, सई सुपेकर, श्रावणी लकडे यांनी स्पर्धेमध्ये सहभाग घेतला.स्पर्धेमध्ये 27 राज्यांतील तब्बल 1800 पेक्षा जास्त खेळाडूंचा सहभाग होता. यशस्वी खेळाडूंना संजय आनंदकर स्पोर्ट्स अकॅडमीचे मास्टर जयेश आनंदकर तसेच महाराष्ट्र राज्य किक बॉक्सिंग संघाचे कोच सिद्धेश आनंदकर यांचे मार्गदर्शन लाभले. या सुवर्ण कामगिरीबद्दल सर्व खेळाडूंचे आमदार बबनराव पाचपुते, ज्येष्ठ नेते बाबासाहेब भोस, घन:शाम अण्णा शेलार, राजेंद्र दादा नागवडे, मा.आमदार राहुल दादा जगताप, मा.नगराध्यक्ष बापू तात्या गोरे, नगराध्यक्षा शुभांगी ताई पोटे, उपनगराध्यक्ष ज्योतीताई खेडकर, ग्रँडमास्टर संजय आनंदकर, महाराष्ट्र राज्य किक बॉक्सिंगचे अध्यक्ष नीलेश शेलार यांनी अभिनंदन केले आहे.
गेल्या 32 वर्षांपासून श्रीगोंदा शहरामध्ये मार्शल आर्टचे मोफत प्रशिक्षण देत आहोत.प्रत्येक वर्षी जिल्हा, विभाग आणि राज्यपातळीवर पदके मिळवून आपले खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरून सातत्याने देशपातळीवर श्रीगोंद्याचे नाव उंचावत आहेत याचा अभिमान आहे.
ग्रँडमास्टर संजय आनंदकर
COMMENTS