Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पुणे रिंगरोडप्रकरणात जनतेच्या पैश्यांची लूट

भाजपला 996 कोटींचा निवडणूक निधी दिलेल्या कंपनीला दिले काम

पुणे ः पुणे प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभागातील निविदा घोटाळा उघड करण्यापूर्वीच दैनिक लोकमंथनने पुण्यातील रिंग रोडच्या कामातील मिलीभगत उघड केली

सामाजिक न्याय दिन ‘अन्याय दिन’ म्हणून साजरा करावा का ?
सचिव सुमंत भांगेचा एक हजार कोटींचा भोजनठेका घोटाळा ?
बार्टीच्या प्रशिक्षण कार्यक्रमावर मंत्री देसाईंची उत्तर देतांना दमछाक

पुणे ः पुणे प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभागातील निविदा घोटाळा उघड करण्यापूर्वीच दैनिक लोकमंथनने पुण्यातील रिंग रोडच्या कामातील मिलीभगत उघड केली होती, त्याची पुन्हा एकदा आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलखोल केली आहे. ज्या कंपनीने भाजपला 996 कोटी रूपयांचा निवडणूक निधी दिला, त्याच कंपनीला रिंगरोडचे काम देण्याचा प्रमाद एमएसआरडीचे मुख्य अभियंता राजेश पाटील आणि अधीक्षक अभियंता राहुल वसईकर यांनी करत जनतेच्या पैशाची लूट केली आहे.
पुणे प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभागात 1 हजार 33 कोटींचा निविदा घोटाळ्यानंतर रिंगरोडच्या निविदा कामात घोटाळा होणार नसेल तर नवल नको. पुणे रिंग रोडच्या निविदा प्रक्रियेत महायुती सरकार, एमएसआरडीचे अधिकारी व ठेकेदार यांच्या लॉबीने अंदाजित रेट पेक्षा तब्बल 40-45  टक्के जास्त दराने निविदा भरल्याचे निदर्शनास आले आहे. एमएसआरडीसारख्या महामंडळाने याबाबत व्यवस्थित छाननी करून ही प्रक्रिया राबविणे गरजेचे होते, हेच ठेकेदार नॅशनल हायवे ऑथरिटीचे काम करत असतांना यापेक्षा 25-30 टक्के कमी दराने काम करतात. यात आणखी एक गंभीर बाब अशी की, यातील मेघा इंजिनिअरिंग या कंपनीला यातील 3 टप्प्यांचे काम मिळाले आहे, मेघा इंजिनियर ही भाजपला निवडणूक रोख्याच्या माध्यमातून निवडणूक निधी देणारी 2 नंबरची कंपनी आहे. या कंपनीने भाजपला तब्बल 996 कोटींचा निवडणूक निधी दिलेला आहे. तसेच रोड वे सोल्युशन या ब्लॅक लिस्टमध्ये असलेल्या कंपनीला देखील एका वर्षाच्या आत भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी पवित्र केले व आपल्या रिंग रोडचे काही काम त्यांना देखील देण्यात आले आहे. त्यामुळेे बांधकाम विभागातील एमएसआरडीसी असो की, पुणे प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभाग असो, यातील मुख्य अभियंता यांनी भ्रष्टाचाराचे  मोठे जाळे विणले असून, या माध्यमातून मोठा भ्रष्टाचार चालवला आहे. हा भ्रष्टाचार हजोरो कोटींचा असून, यातून जनेच्या पैशांची लूट या अभियंत्यांनी चालवली आहे. ठेकेदरांना पैश्यांची मागणी करणे, त्यातून मिलीभगत करून खोटे कागदपत्रे बनवून ही निविदा प्रक्रिया राबवली जाते. त्यामुळे संपूर्ण बोगस कागदपत्रांच्या माध्यमातून हा निविदा घोटाळा सुरू आहे, त्यामुळे रिंगरोडची निविदा, पुणे प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभागातील रस्त्यांच्या निविदांची चौकशी करण्याची गरज आहे.

एसआयटी नेमून निविदा घोटाळ्याची चौकशी करा – पुणे प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभागातील घोटाळा असेल, किंवा पुण्यातील रिंगरोड निविदा घोटाळा असेल, या संपूर्ण प्रकरणाची विशेष एसआयटी नेमून चौकशी होण्याची गरज आहे. कारण यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागातील अनेक बडे अधिकारी, कंत्राटदार, राजकीय लोकप्रतिनिधी यांचा हात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एसआयटी नेमल्यास या संपूर्ण प्रकरणाची पोलखोल होवून जनतेच्या पैशांचा होणारा अपव्यय वाचेल.

पुणे प्रादेशिक सा.बां. विभागातील निविदा घोटाळ्याच्या पॅटर्नचे जनक कोण ? – पुणे प्रादेशिक सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये निविदा घोटाळ्याचा जो पॅटर्न आहे, तो इतर सार्वजनिक बांधकाम विभागात देखील दिसून येत आहे. त्यामुळे या निविदा घोटाळ्याचे मुख्य सुत्रधार कोण, अशी चर्चा सार्वजनिक बांधकाम विभागात दिसून येत आहे. निविदा घोटाळा करण्याचा पॅटर्न सार्वजनिक बांधकाम विभागात एकसारखाच दिसून येत आहे. त्यामुळे या निविदा घोटाळ्याच्या पॅटर्नचे जनक कोण असा सवाल उपस्थित होत आहे. या पॅटर्न अंतर्गत रस्त्यांच्या कामांमध्ये हजोरो कोटींचा गैरव्यवहार करण्यात येत आहे. या रस्त्यांच्या कामांसाठी काढण्यात आलेल्या निविदा अंदापत्रकामध्ये जादा रक्कम दाखवण्यात येते, तसेच या निविदा मंजूर करतांना सध्याचा ट्रेड 25 टक्के कमी दराने चालू आहे, पंरतू सदर निविदा 05 ते 10 टक्के बिलो करण्यात येत आहे.

COMMENTS