Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जितेंद्र आव्हाडांकडून मनुस्मृतीचे प्रतीकात्मक दहन

महाड ः शालेय अभ्याक्रमात मनुस्मृतीतील चांगले श्‍लोक समाविष्ट करण्याच्या विरोधात बुधवारी महाड येथे मनुस्मृतीचे प्रतीकात्मक दहन केले. यावेळी बोलतां

सोलापूरात तापमाण चाळीशी पार
नक्टीच्या लग्नाला सतरा इग्न. राष्ट्रीय महामार्गाचे काम काही होईना
जळगावमध्ये पत्रकाराला बेदम मारहाण

महाड ः शालेय अभ्याक्रमात मनुस्मृतीतील चांगले श्‍लोक समाविष्ट करण्याच्या विरोधात बुधवारी महाड येथे मनुस्मृतीचे प्रतीकात्मक दहन केले. यावेळी बोलतांना मनुस्मृतीमधील श्‍लोकांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात झाला तर राजीनामा देणार का? असा प्रश्‍न आव्हाड यांनी उपस्थित केला आहे. जितेंद्र आव्हाड मनुस्मृतीचे दहन करण्यासाठी महाडमध्ये पोहोचल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना नोटीसा देखील बजावल्या आहेत. पोलिसांनी या कार्यक्रमाला परवानगी नाकारली असली तरी मनुस्मृतीचे दहन करणार असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार रायगडच्या महाड येथील चवदार तळ्यावर जात मनुस्मृतीचे दहन करत सरकारच्या या निर्णयाचा आव्हाड यांनी निषेध केला. यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मनुस्मृती पुन्हा एकदा लागू करण्याचा प्रयत्न सत्ताधारी पक्षाच्या वतीने करण्यात येत आहे. त्यासाठी ते मागच्या दाराचा वापर करत असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. शालेय अभ्यासक्रमात भगवत गीता, मनाचे श्‍लोक यांचा समावेश करण्यात येणार आहे. मागच्या दाराने हा देशात मनुस्मृती लागू करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप विरोधी पक्षाचे नेते करत आहे. संविधानाला न मानणारे लोकच मनुस्मृती लागू करण्यासाठी हा प्रयत्न करत असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला आहे.

COMMENTS