Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जळगावमध्ये एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू

जळगाव ः जळगावमध्ये वादळी वार्‍यामुळे घर कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत आठ वर्षाचा मुलगा सुदैवाने बचावला आहे. यावल तालुक

लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा बळी
नांदेड तालुक्यात सोमेश्वर  परिसरात  गारांचा वादळी वार्‍यासह पाऊस
श्रीगोंदा शहरासह तालुक्यात रमजान ईद उत्साहात

जळगाव ः जळगावमध्ये वादळी वार्‍यामुळे घर कोसळून एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत आठ वर्षाचा मुलगा सुदैवाने बचावला आहे. यावल तालुक्यातील थोरपाणी परिसरात ही घटना घडली. या घटनेने परिसरात शोकाकुल वातावरण पसरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नानसिंह गुला पावरा (वय,28) त्यांची पत्नी सोनूबाई नानसिंग पावरा (वय,22) आणि त्यांचा मुलगा रतीलाल पावरा (वय,3), मुलगी बालीबाई (वय,2) अशी या घटनेत मरण पावलेल्यांची नावे आहेत. रविवारी संध्याकाळी सोसाट्याचा वारा सुटल्यामुळे नानसिंग आपल्या कुटुंबासह दरवाजा बंद करून घरात बसला. मात्र, तितक्यात होत्याचे नव्हते झाले.

COMMENTS