Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घारगावमध्ये शेकडा ब्रासची रॉयल्टी आणि कोट्यवधींचे उत्खनन

श्रीगोंदा शहर:  राज्यात अवैद्य बाळू, माती,मुरुम उत्खनन वाहतूक बंद असताना श्रीगोंदा तालुक्यात मात्र नगर-दौड रोडवरील घारगांव येथील रानमाळ येथुन 3 त

चौकशी एजन्सीचा गैरवापर करत विरोधकांना झुकवण्याचे काम सुरू- मंत्री एस.निरंजन रेड्डी
संगमनेर बाजार समितीच्या सभापतीपदी शंकरराव खेमनर
संत ज्ञानेश्‍वर स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

श्रीगोंदा शहर:  राज्यात अवैद्य बाळू, माती,मुरुम उत्खनन वाहतूक बंद असताना श्रीगोंदा तालुक्यात मात्र नगर-दौड रोडवरील घारगांव येथील रानमाळ येथुन 3 ते 4 पोकलेन मशीन व दहा ते 124 हायवा यांच्या साह्याने रात्र दिवस मुरूम उत्खनन करून नाममात्र शेकडो ब्रासची रॉयल्टी भरून कोट्यावधी रुपयांचा मुरुमाचे उत्खनन करुन राजरोसपणे खुलेआम येथून हजारो ब्रास मुरूम उचलून अनाधिकृतपणे बाहतूक केली जात आहे. याकडे महसुल अधिकारी, कर्मचारी राजकिय दबावापोटी आणि म स्वतःच्या फायद्यासाठी जाणून बुजुन दुर्लक्ष करत आहेत.
सविस्तर माहिती अशी की, नगर-दौंड रोडवरील घारगांव येथील भगवान श्रीराम करंजुले यांच्या स्वतःच्या मालकीच्या गट नंनं.251 ब मधून 3 ते 4 पोकलेन मशीन व 10 ते 12 हायवा वांच्या साह्याने रात्र दिवस अवैध मुरुम उत्खनन करून राजरोसपणे खुलेआम अनाधिकृतपणे वाहतूक केली जात आहे. गौण खनिज उत्खनन (मुरुम) करण्यासाठी जिल्हा गौण खनिज विभागाकडून गट आरक्षित करन परवानगी घेत गौण खनिज उत्खनन करणे गरजेचे असताना राजरोसपणे विनापरवाना गटामधून मुरूम उत्खनन सुरू आहे. नाममात्र (शेकडो ब्रासची) रॉयल्टी भरून कोट्यावधी रुपयांच्या मुरुमाचे उत्खनन करून राजरोसपणे खुलेआम येथून हजारो ब्रास मुरूम उचलून अनाधिकृतपणे बाहतूक केली जात आहे. मुरूम उत्खनन करताना या परिसरातील कडूलिंब,भाबुळ या मोठ मोठी झाडे मशीनच्या साह्याने उपटून टाकले जातआहेत. राजकीय नेत्याच्या दबावापोटी आणि कागदी घोडे नाचवून सर्वांच्या स्वार्थासाठी याकडे महसुलचे कर्मचारी, अधिकारी राजकीय नेते दबावापोटी व स्वतःच्या फायद्यासाठी जाणुन बुजुन दुर्लक्ष करत असताना अनेक सामजिक कार्यकत्यांनी महसूल अधिकार्‍यांकडे तोंडी तक्रार करुन देखील याकडे अधिकारी व महसूल कर्मचान्यानी अवैध मुख्म उत्खनन करणार्‍या मुरुम माफियाबरोबर असलेल्या हितसंबंधमुळे जाणीवपूर्वक  कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.

COMMENTS