Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उक्कडगावमध्ये मुंजोबा विद्यालयाच्या प्रवेशद्वाराचे लोकार्पण

श्रीगोंदा शहर: श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव येथे प्रवेशद्वार लोकार्पण सोहळा संपन्न झाला. स्व. सुभाष किसन साळवे यांचे प्रथम स्मृतिप्रीत्यर्थ साळ

Ahmednagar : सीना नदीचे होणार सुशोभिकरन…मंत्री जयंत पाटलांनी केली पाहणी
खतांच्या वाढत्या किमतींमुळे शेतकरी झाले हवालदिल
सामाजिक न्यायचे तत्व आत्मसात केल्या शिवाय डॉ आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण होणार नाही- अँड.नितीन पोळ

श्रीगोंदा शहर: श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव येथे प्रवेशद्वार लोकार्पण सोहळा संपन्न झाला. स्व. सुभाष किसन साळवे यांचे प्रथम स्मृतिप्रीत्यर्थ साळवे परीवाराकडून मुंजोबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयास प्रवेशद्वार भेट देण्यात आला. या प्रवेशद्वार लोकार्पण सोहळ्याचे उद्घाटन स.म.शि.ना.ना.साखर कारख्यान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांच्या शुभहस्ते पार पडले.
     यावेळी राजेंद्र नागवडे म्हणाले की, साळवे परीवाराने आपणही या समाजाचे देणे लागतो. या भूमिकेतून सामाजिक बांधिलकी जपत स्व.सुभाष साळवे यांचे स्मृतीप्रीत्यर्थ हा प्रवेशद्वार भेट देण्यात आला. खरोखर साळवे परीवाराचा आदर्श घेण्यासारखा आहे. जीवनामध्ये प्रत्येकाला आपल्या कुटुंबाबद्दल आदर आहे.आज अशा प्रकारचे योगदान देण्यात आले. जीवनामध्ये अशा गोष्टींची आवश्यकता आहे. भावी विद्यार्थी घडविण्यासाठी ग्रामस्थांनी जर अशाप्रकारे योगदान दिले. तर भावी विद्यार्थ्यांचे उज्वल भवितव्य असेल असे ते म्हणाले. यावेळी साळवे परीवाराचा विद्यालयाचे वतीने सन्मान करण्यात आला. यावेळी दत्तात्रय कातोरे, सावतानाना हिरवे, डि.आर.आबा काकडे, गावचे ग्रामस्थ, तसेच पदाधिकारी सरपंच,उपसरपंच,आजी माजी विद्यार्थी, उपस्थित होते. प्रास्ताविक मुख्याध्यापक शितोळे बी.टी, सुत्रसंचलन चंद्रभान कातोरे, आभार बोरूडे यांनी मानले.

COMMENTS