कोपरगाव ः कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या कोपरगाव येथील के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा 12 वीचा निकाल उत्कृष्ट लागला आहे. पुणे विभागीय
कोपरगाव ः कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीच्या कोपरगाव येथील के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाचा 12 वीचा निकाल उत्कृष्ट लागला आहे. पुणे विभागीय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी 2024 मध्ये घेतलेल्या 12 वी परीक्षेचा निकाल नुकताच इंटरनेटवर जाहीर झाला असून के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाने उज्ज्वल निकालाची परंपरा याही वर्षी कायम राखली आहे.
यामध्ये 12 वी विज्ञान शाखेतून प्रथम क्रमाकांने तेजस विकास नेरे 93.33, द्वितीय प्राजक्ता पंकज नांदुरकर 88. 00, तृतीय प्रणव रतन दवंगे 87.00 टक्के गुण मिळवले असून, 12 वी वाणिज्य शाखेमध्ये अस्मिता रामराव देवकर 93. 50, अथर्व योगेश शेटे 87.33, ज्ञानेश्वरी शंकरराव पवार 86.17 टक्के गुण मिळवले. तर कला शाखेतून प्रियंका रघुनाथ मोहिते, 80. 50, तनुष्का सनी गुंजाळ 79. 17 टक्के, धनश्री महेंद्र साळवे, 73. 33 टक्के गुण मिळवले आहे. संस्थेच्या के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालय जवळके व चासनळी या दोन्ही महाविद्यालयाचा निकाल 100 टक्के लागलेला आहे. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे, सचिव अॅड. संजीव कुलकर्णी, विश्वस्त संदीप रोहमारे, सर्व पदाधिकारी व प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बी.आर. सोनवणे, रजिस्ट्रार डॉ. ए. सी.नाईकवाडे यांनी अभिनंदन केले. वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयाची प्रवेश प्रकिया सुरु झालेली असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उत्कृष्ट करियर ओरिएंटेड अभ्यासक्रम बी.बी.ए.(सीए.), बी.सी.एस., बी.सी.ए. (सायन्स), बी.एस्सी. (मायक्रोबायोलॉजी) चे प्रवेश सुरु झाले आहेत. प्रवेश क्षमता मर्यादित असल्यामुळे विद्यार्थ्यांनी त्वरित प्रवेश घ्यावा असे आवाहन प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी केले आहे
COMMENTS