Homeताज्या बातम्यादेश

किर्गिस्तानमध्ये उसळला हिंसाचार

महाराष्ट्रातील 500 विद्यार्थी अडकले

नवी दिल्ली : किर्गिस्तान या देशामध्ये हिंसाचार उफाळून आला असून, हल्लेखोरांकडून भारतातील आणि पाकिस्तानातील विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यात येत आहे.

समझने वालोंको…
एस टी बस मधून महिलेच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी
 ग्रामपंचायत विरगावच्या वतीने  माजी पोलिसांचा व आर्मी सैनिकांचा सन्मान

नवी दिल्ली : किर्गिस्तान या देशामध्ये हिंसाचार उफाळून आला असून, हल्लेखोरांकडून भारतातील आणि पाकिस्तानातील विद्यार्थ्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. आत्तापर्यंत या हल्ल्यात 7 पाकिस्तानी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यातच महाराष्ट्रातील तब्बल 500 विद्यार्थी किर्गिस्तान या देशामध्ये अडकल्याचे समोर आले आहे.
भारतीय विद्यार्थी सुखरूप असल्याचे समोर आले आहे. मात्र राज्यातील 500 विद्यार्थ्यांची सुटका करण्याचे आव्हान भारत सरकारसमोर आहे. या विद्यार्थ्यांमध्ये मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. याशिवाय पश्‍चिम महाराष्ट्रातील काही विद्यार्थी देखील अडकून पडलेले आहेत. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी हे विद्यार्थी किर्गिस्तानमध्ये गेलेले आहेत. सरकारने आमची सुटका करावी, अशी विनवणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. भारत पाकिस्तानी विद्यार्थ्यांवर हल्ला झाल्यानंतर किर्गिस्तानमधील वातावरण चांगलंच तापले आहे. देशात दररोज हिंसाचाराच्या घटना घडत असून विद्यार्थ्यांवर हल्ले होत आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय स्थानिक प्रशासनाने घेतला आहे. दरम्यान, परीक्षेनंतर जून महिन्यात किर्गिस्तानमध्ये अडकून पडलेले सर्व विद्यार्थी भारतात परतण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे भारतीय दूतावासाने किर्गिस्तानमधील भारतीय विद्यार्थ्यांना घरातच राहण्याचा सल्ला दिला आहे. त्यांना भारतीय दूतावासाशी संपर्क साधण्याचेही सांगण्यात आले आहे. विद्यार्थ्यांसाठी एक हेल्पलाइन संपर्क क्रमांक देखील जारी करण्यात आला आहे. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात आहोत. सध्या परिस्थिती शांत आहे परंतु विद्यार्थ्यांनी घरातच राहावे, तसेच कोणतीही समस्या झाल्यास आम्हाला 0555710041 या क्रमांकावर साधावा असे किर्गिझमधील भारतीय दूतावासाने सांगितले.

COMMENTS