नवी दिल्ली ः देशामध्ये अवकाळी पाऊस पडत असतांना दुसरीकडे उष्णतेची लाट मंगळवारी देखील कायम असल्यामुळे अनेक राज्य पुरते घामाघुम झाल्याचे दिसून येत आ
नवी दिल्ली ः देशामध्ये अवकाळी पाऊस पडत असतांना दुसरीकडे उष्णतेची लाट मंगळवारी देखील कायम असल्यामुळे अनेक राज्य पुरते घामाघुम झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये मंगळवारपासून 4 दिवस उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला आहे.
हिमाचल प्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आणि जम्मू-काश्मीरच्या जम्मू विभागात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. या राज्यांमध्ये पुढील 4-5 दिवस उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळण्याची शक्यता नसल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. याशिवाय उष्णतेच्या लाटेचा इशारा असलेल्या राज्यांमध्येही तापमान 44 ते 47 अंशांच्या दरम्यान राहिले. सोमवारी दिल्लीच्या नजफगडमध्ये 47.4 अंश तापमानाची नोंद झाली. रविवारी तापमान 48 अंशांच्या जवळ पोहोचले.उष्णतेमुळे पंजाबमधील शाळांमध्ये मंगळवारपासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्याच वेळी, हिमाचल आणि जम्मूमध्ये शाळांच्या वेळा वाढवण्यात आल्या आहेत. दिल्लीतही शाळा तातडीने बंद करण्यास सांगण्यात आले आहे.
COMMENTS