Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खंडाळा घाटातील अपघातात दोघांचा मृत्यू

पुणे : जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बॅटरी हिलजवळ भीषण अपघात झाला आहे. एक कंटेनर आणि कारच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात कारमध्ये बसल

एसटी बस आणि चारचाकी वाहनाच्या अपघातात तिघांचा मृत्यू
विद्यार्थ्यांच्या कारचा भीषण अपघात
छत्तीसगडमध्ये अपघातात 6 जणांचा मृत्यू

पुणे : जुन्या मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बॅटरी हिलजवळ भीषण अपघात झाला आहे. एक कंटेनर आणि कारच्या दरम्यान झालेल्या भीषण अपघातात कारमध्ये बसलेल्या दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. पुण्यावरुन मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर पुण्याच्या दिशेने येणार्‍या कारवर एका अवघड वळणावर पलटल्याने हा अपघात झाला आहे.
लोणावळ्याकडून जुन्या मुंबई पुणे महामार्गाने मुंबईकडे जात असताना वाघजाई मंदिराच्या पुढे बॅटरी हिल परिसरात या रस्त्याला तीव्र उतार आणि वळण आहे. याच ठिकाणी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणारा कंटेनर हा समोरून येणार्‍या कारवर पलटला. सदर कार ही अलिबाग वरुन तळेगाव दभाडेच्या दिशेने निघाली होती. या कारमध्ये तळेगाव येथील रहिवासी असलेल्या चौधरी कुटुंबातील आठ जण प्रवास करीत होते. या अपघातात कविता दत्तात्रय चौधरी आणि दत्तात्रय चौधरी या दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर योगेश चौधरी, जान्हवी चौधरी, दिपांशा चौधरी, जिगिशा चौधरी, मितांश चौधरी, आणि भूमिका चौधरी, हे सहा जण जखमी झाले आहे. सर्व जखमींना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. 

COMMENTS