Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

यशोधन कार्यालयाकडून काकडवाडीतील आदिवासी कुटुंबास मदत

अवकाळी पावसाने घर उडालेल्या कुटुंबास किराणा किटची मदत

संगमनेर प्रतिनिधी ः विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एक तालुका एक परिवार ही संकल्पना राबवली जात असून तालुक्याच

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्याविरोधात धडकला मोर्चा
दिघोळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी दशरथ राजगुरू
सधन व्यक्तींनी अन्नसुरक्षा योजनेतून बाहेर पडावे : तहसीलदार पाटील

संगमनेर प्रतिनिधी ः विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली एक तालुका एक परिवार ही संकल्पना राबवली जात असून तालुक्याच्या विविध कुटुंबांच्या सुखदुःखात आमदार बाळासाहेब थोरात नेहमी सहभागी होत असतात नुकत्याच झालेल्या वादळी वार्‍याने व अवकाळी पावसाने काकडवाडी येथील नुकसानग्रस्त झालेल्या आदिवासी कुटुंबाला इंद्रजीत भाऊ थोरात ,डॉ जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधन कार्यालयाच्या वतीने किराणा किटचे वाटप करण्यात आले. संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील दत्तू वेनुनाथ माळी या आदिवासी  कुटुंबाचे मागील आठवड्यात झालेल्या वादळी वार्‍याने व पावसाने घरावरील पत्रे उडाले व घरातील सर्व जिवानावश्यक वस्तू कपडे धान्य यांची मोठे नुकसान झाली. त्यांच्या राहत्या घराची भिंतही कोसळली. त्यामुळे आदिवासी कुटुंबावर मोठे संकट ओढावले. ही माहिती यशोधन कार्यालयाचे जनसेवक केशव फड यांनी यशोधन कार्यालयाला कळवताच इंद्रजीत भाऊ थोरात व कॅन्सर तज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी सेवक प्रा बाबा खरात यांनी कुटुंबाला तातडीने भेट दिली. व यशोधन कार्यालय मार्फत सदर कुटुंबास किराणा साहित्य वाटप करण्यात आले. दत्तू वेणूनाथ माळी यांना शबरी घरकुल योजनेअंतर्गत घर मिळाले होते. त्यांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. घरकुलासाठी दुरुस्तीसाठी मदत मिळावी यासाठी गटविकास अधिकारी संगमनेर यांना आमदार बाळासाहेब थोरात यांचे शिफारस पत्र दिले असून स्थानिक कामगार तलाठी यांचे मार्फत पंचनामा करून शासनामार्फत शक्य ती आर्थिक सहकार्य दिले जाईल अशी माहितीही प्रा बाबा खरात यांनी यावेळी दिली. आपत्तीग्रस्त, संकटात सापडल्यांना, नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्यांना, अपघाती मृत्यू झालेल्यांना यशोधन कार्यालयातून तत्पर सेवा दिली जाते. कार्यालयाचे मार्गदर्शक आमदार बाळासाहेब थोरात इंद्रजीत भाऊ थोरात डॉ जयश्रीताई थोरात श्रीराम कुर्‍हे, पी वाय दिघे, आरोग्य सेवक महेश वाव्हाळ सर्व जनसेवक यांच्याकडून वेळोवेळी यशोधन कार्यालयामार्फत मदत मिळवून दिली जाते.

COMMENTS