Homeताज्या बातम्यादेश

केजरीवालांच्या माजी स्वीय सहायकाला अटक

स्वाती मालीवाल प्रकरणात पोलिसांची कारवाई

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या अर्थात आपच्या खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाणप्रकरणी दिल्ली पोलिसांनी शनिवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरी

पंतप्रधान मोदी रशिया आणि ऑस्ट्रियाच्या दौर्‍यावर
कोल्हापुरात शिळे अन्न खाल्ल्याने 52 गायीचा मृत्यू
भाजप आमदार जयकुमार गोरेंचा उच्च न्यायालयाने जामीन फेटाळला

नवी दिल्ली : आम आदमी पक्षाच्या अर्थात आपच्या खासदार स्वाती मालीवाल यांना मारहाणप्रकरणी दिल्ली पोलिसांनी शनिवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे माजी स्वीय सहायक बिभव कुमार याला अटक केली आहे. मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई केली आहे. विभव कुमार हे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहायक होते, त्यांना बडतर्फ करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे माजी स्वीय सहायक विभव कुमार यांना मालीवाल यांना मारहाण करणे भोवलं आहे. मालीवाल यांच्या मारहाणीच्या तक्रारीनंतर दिल्ली पोलिसांनी विभव कुमार यांना अटक केली आहे. विभव कुमार यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावरून अटक केली आहे. अटक केल्यानंतर पोलिस स्टेशनमध्ये जाऊ दिले जात नाही, असा आरोप त्यांच्या वकिलांनी केला आहे. विभव कुमार यांना सिव्हिल लाईन्स पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आले. त्यानंतर आपचे लीगल सेल प्रमुख संजीव नासीयार यांनी पोलिस स्टेशनमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी रोखले. सूत्रांच्या माहितीनुसार, विभव कुमार यांनी तक्रारीचा मेल दिल्ली पोलिसांना केला होता. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी त्यांचा आयपी अ‍ॅड्रेस ट्रॅक केला. त्यानंतर पोलिसांचे पथक विभव कुमार यांच्या मागावर होते. पोलिसांच्या पथकाने विभव कुमार यांना मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर अटक केली. दरम्यान, 13 मे रोजी स्वाती मालीवाल यांना मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे.

COMMENTS