Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उद्योजक अविनाश भोसले यांना जामीन

पुणे : येस बँक घोटाळाप्रकरणी तब्बल दोन वर्षांपासून अटकेत असलेले पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले यांना शुक्रवारी दिलासा मिळाला आहे. मुुंबई

बिस्किट खाल्ल्याने 50 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना विषबाधा
विजय स्तंभास लाखो आंबेडकरी अनुयायांनी केले अभिवादन
बिल्कीस बानो प्रकरणातून न्या. बेला त्रिवेदींची माघार

पुणे : येस बँक घोटाळाप्रकरणी तब्बल दोन वर्षांपासून अटकेत असलेले पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक अविनाश भोसले यांना शुक्रवारी दिलासा मिळाला आहे. मुुंबई उच्च न्यायालयाने त्यांना एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. सीबीआयच्या खटल्यामध्ये भोसले यांना उच्च न्यायालयाने जामीन दिला आहे. तर मात्र, आणखी एका केसमध्ये जामीन होणे बाकी असल्याची माहिती मिळत आहे. येस बँक घोटाळा प्रकरणी 26 मे 2022 रोजी सीबीआयने अटक केली होती. अविनाश भोसले हे पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आहेत. गेल्या दोन वर्षांपासून भोसले हे तुरुंगात आहेत. येस बँक आणि डिएचएफएल घोटाळा प्रकरणात सीबीआयने त्यांना अटक केली होती. अनियमती कर्ज दिल्याचा आरोप अविनाश भोसले यांच्यावर आरोप आहेत. त्यांनी काही महिन्यांपूर्वी देखील जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र, कोर्टाने दिलासा देण्यास नकार दिला होता. त्यानंतर शुक्रवारी अविनाश भोसले यांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. सीबीआयने एका वर्षांपूर्वी 40.34 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त केली होती. तर ईडीने विदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियमांतर्गत त्यांच्या एबीआयएल कंपनीच्या मुख्यालयावरही कारवाई केली होती. त्यानंतर 30 एप्रिल 2022 रोजी भोसले यांच्या पुण्यातील एबीआयएल या कार्यालयावर ’सीबीआय’कडून छापा टाकला होता. त्यानंतर भोसले यांना 26 मे 2022 रोजी अटक करण्यात आली होती.

COMMENTS