नवी दिल्ली ः आपच्या खासदार आणि दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालीवाल यांच्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्

नवी दिल्ली ः आपच्या खासदार आणि दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा स्वाती मालीवाल यांच्यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी मारहाण झाल्याची एफआयआर नोंदवली आहे. त्यामध्ये मालीवाल यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहायक बिभव कुमार यांनी कानशिलात लगावल्यानंतर पोटात लाथा घातल्याचा गंभीर आरोप केला आहे. एफआयआरनुसार मालीवाल यांनी आरोप केला आहे की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहाय्यक विभव कुमारने त्यांना सात ते आठवेळा कानाखाली लगावली. त्यांच्या पोटात लाथा मारल्या. त्यावेळी माझी मासिक पाळी सुरू होती, तरीही त्यांनी मारहाण केली. स्वाती मालीवाल यांनी दंडाधिकार्यांसमोर जबाब नोंदवण्यात आला आहे. याआधी गुरुवारी रात्री 11 वाजता दिल्ली पोलीस आप खासदार स्वाती मालीवाल यांच्यासोबत एम्समध्ये पोहोचले होते. जिथे त्यांचे मेडिकल झाले. त्यांनी पोलिसात तक्रार दिल्यानंतर त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सहकारी बिभव कुमार यांच्या नावाचा एफआयआरमध्ये समावेश आहे. हल्ल्याच्या वेळी उपस्थित पोलिस कर्मचारी आणि कर्मचार्यांची चौकशी करण्यासाठी आणि त्यांचे जबाब नोंदवण्यासाठी दिल्ली पोलिस मुख्यमंत्र्यांच्या घरी जाण्याची शक्यता आहे. केजरीवाल यांच्या घरी ज्या कंपनीने सीसीटीव्ही लावले आहेत, त्यांचीही मदत पोलीस घेणार आहेत. केजरीवाल यांच्या घराबाहेर आठ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. पोलिस घटनेशी संबंधित सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासणार आहेत.
बिभवकुमार घरातून फरार ? – स्वाती मालीवाल यांच्यावर हल्ल्याप्रकरणी एफआयआर दाखल झाल्यानंतर दिल्ली पोलीस अॅक्शन मोडवर आली. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निकटवर्तीय आणि स्वीय सहाय्यक बिभव कुमार यांनी मालीवाल यांच्यावर मारहाण केल्याचा आरोप आहे. दिल्ली पोलिसांकडून बिभव कुमार यांना अटक केली जाण्याची शक्यता. दिल्ली पोलिसांचे पथक बिभव कुमार यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. पण विभव कुमार घरी नसल्याची माहिती मिळाली. त्यामुळे अटकेच्या भीतीने बिभवकुमार फरार झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
COMMENTS