Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिला स्वयंसहाय्यता गटातील महिलांचा जनजागृती अभियानात सहभाग

नाशिक : नाशिक जिल्हा स्वीप समितीच्या माध्यमातून स्वीप नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ८ मे ते १

समीर वानखेडेंच्या अडचणीत वाढ ; जात पडताळणी समितीकडे तक्रार
राज्यात दुष्काळ सदृश्य आणि मंत्री मात्र अदृश्य
ममता बॅनर्जीचे भाजपविरोधी आघाडीचे संकेत

नाशिक : नाशिक जिल्हा स्वीप समितीच्या माध्यमातून स्वीप नोडल अधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली दि. ८ मे ते १४ मे दरम्यान मतदार जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या आता हा अंतर्गत दि.१३ रोजी संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान नाशिकच्या वतीने महिला मतदार जागृती उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, जिल्ह्यातील १४ हजार ४०८ महिला स्वयंसहायता गटातील एक लाख १३ हजार ६०५ महिलांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला.

मतदार जनजागृती सप्ताह अंतर्गत आज (दि.१३) रोजी संपूर्ण जिल्ह्यात महिला स्वयंसहायता गटांकडून एकाच वेळी विविध उपक्रम राबवून ग्रामीण भागातील मतदारांमध्ये जनजागृती करण्यात आली. यामध्ये गावात रांगोळी स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, बाईक रॅली, गृहभेटी उपक्रमांचा समावेश होता. काही गावांमध्ये महिला चल साताऱ्यांच्या वतीने स्वयंसहायता समूहांच्या वतीने सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले होते यात गावातील महिलांनी फोटो काढत मतदार जनजागृतीचा संदेश दिला. नाशिक तालुक्यातील एकलहरे गावात महिला कीर्तनकार यांच्या वतीने कीर्तनातून मतदार जनजागृती करण्यात आली. संपूर्ण जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यामातून महिला स्वयंसहायता समूहांच्या वतीने दि.१९ मे पर्यंत विविध उपक्रमांद्वारे मतदार जनजागृती मोहीम अशीच सुरू राहणार असल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे यांनी दिली.

COMMENTS