filter: 0; jpegRotation: 0; fileterIntensity: 0.000000; filterMask: 0; पाथर्डी ः पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगावाला पिण्याच्या पाण्याची समस्या
पाथर्डी ः पाथर्डी तालुक्यातील पागोरी पिंपळगावाला पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली असून पाण्याचे टँकरच्या खेपा नियमित मिळाव्या आणि जनावरांना वाढीव पिण्याच्या पाण्याचे टँकर त्वरित मंजूर करून द्यावे या मागणीसाठी तेथील ग्रामस्थांनी पाथर्डी तहसील समोर आमरण उपोषण केले दरम्यान पंचायत समितीच्या अधिकार्यांच्या लेखी आश्वासनानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनात बाळासाहेब ढाकणे, कल्पेश घनवट, राजेंद्र दराडे, मन्सूर पटेल, संभाजी पाचरणे, संपत दराडे, सुनील पाखरे, अंबादास जावळे, आजिनाथ दराडे, एकनाथ वाघमारे, प्रल्हाद दराडे, निवृत्ती नागरे, शहामीर शेख, शरद बडे, सुखदेव नवगिरे, आधी सहभागी झाले होते. पागोरी पिंपळगावाला दररोज 70 हजार लिटर पाणी टँकरद्वारे पुरवठा करण्यासाठी चार खेपा मंजूर आहेत. मात्र चार ते पाच दिवसाने टँकर गावात येते. त्यामुळे तीव्र पाणीटंचाई निर्माण झाले आहे. सन 2011 च्या जनगणनेनुसार हे पाणी मिळत असून ते ही नियमित मिळत नाही. ऊसतोडणी कामगार हे आता गावी परत येत असून त्यांच्याबरोबर मोठे पशुधन सुद्धा आहे.या जनावरांनाही पाणी मिळावे यासाठी अतिरिक्त टँकरने पाणी पुरवठा करावा, त्यासाठी प्रशासनाने अजून दोन टँकर खेपांना मंजुरी द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी यावेळी केली. प्रांत अधिकारी प्रसाद मते यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात आली. जनावरांना पिण्याचे पाणीसाठी वाढीव टँकर खेपांना मंजूरीसाठी प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे दिली जाईल, नियमित पाण्याचे टँकर गावात येऊन लोकांना पाणी कसे मिळेल याचे नियोजन केले जाईल.असे लेखी आश्वासन पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी अण्णासाहेब गहिरे, दुष्काळ निवारण कक्षाचे संदिप कासार, महादेव धायतडक यांनी आंदोलन करणार्या ग्रामस्थांशी भेटून लेखी पत्राद्वारे दिल्यानंतर हे आंदोलन ग्रामस्थांनी मागे घेतले.
COMMENTS