पुणे : पुणे शहरासह पिंपरी-चिंचवडमधे कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, गुन्हेगारी वाढतांना दिसून येत आहे. त्यातच बुधवारी पिंपरी चिंचवड परिस
पुणे : पुणे शहरासह पिंपरी-चिंचवडमधे कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून, गुन्हेगारी वाढतांना दिसून येत आहे. त्यातच बुधवारी पिंपरी चिंचवड परिसरातील चिखलीत एकाने व्यावसायिक स्पर्धेच्या वादातून दुसर्या एका व्यवसायिकावर गोळ्या झाडल्या. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असून गोळी लागल्याने दुसरा व्यावसायिक गंभीर जखमी झाला आहे.
अजय सुनील फुले (वय 19, रा. मोहननगर, चिंचवड) असे जखमी झालेल्या तरुण व्यावसायिकाचे आहे. हर्षल सोनवणेला (रा. जाधववाडी, चिखली) असे गोळीबार करणार्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी हर्षल याच्या सोबत श्याम चौधरी, कीर्तीकुमार भिऊलाल लिलारे यांच्यावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी झालेल्या अजय याचा गॅस शेगडीचा व्यवसाय आहे. गोळीबार केलेला आरोपी हर्षलचा सुद्धा हाच व्यवसाय आहे. याच व्यावसायिक स्पर्धेतून दोघांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून मोठा वाद सुरू आहे. यामुळे हर्षलने अजयला त्याची स्पर्धा दूर करण्यासाठी अजयला मारण्याचा कट रचला. दरम्यान, दोघांमध्ये वाद मिटावा यासाठी शाम व लिलारे हे दोघे अजयच्या दुकानात आले. दरम्यान, त्यांची चर्चा सुरू असतांना हर्षल हा सुद्धा त्याठिकाणी गेला. यावेळी हर्षलने पिस्टल काढत तीन गोळ्या अजयवर झाडल्या. यातील एक गोळी ही अजयच्या दंडावर लागली तर दुसरी गोळी ही किर्तीकुमार लिलारेच्या ह्याच्या मानेला लागली.
COMMENTS