Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वादळी वार्‍यासह आलेल्या पावसाचा मुंबईला जोरदार तडाखा

मध्य रेल्वे सेवा विस्कळीत; होर्डींग कोसळल्याने तिघांचा मृत्यू; 59 गंभीर

मुंबई / प्रतिनिधी : मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली या भागांमध्ये पाऊस आणि वादळी वारे वाहू लागल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे. अचान

मुंबईत तीन दिवसापासून पावसाचा जोर कायम
मुसळधार पावसामुळे शाळा आणि कॉलेजना सुट्टी जाहीर
अतिवृष्टीने नुकसानग्रस्तांसाठी धोत्रेचे सरपंच गेले धावून

मुंबई / प्रतिनिधी : मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण, डोंबिवली या भागांमध्ये पाऊस आणि वादळी वारे वाहू लागल्याने मुंबईकरांची तारांबळ उडाली आहे. अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांना अडचणींचा सामना करावा लागतो आहे. मुंबईत घाटकोपर येथे होर्डिंग कोसळल्याने तिघांचा मृत्यू झाला तर 59 गंभीर जखमी झाले आहेत. वादळी वार्‍यासह आलेल्या पावसामुळे मुंलुंड आणि ठाणे या दरम्यानचा ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली आहे. त्यामुळे ऑफिसमधून घर गाठणार्‍या मुंबईकरांचे हाल सुरु झाले आहेत. घाटकोपर या स्टेशनवर गर्दीच गर्दी झाली आहे.
मुंलुंड आणि ठाणे या दरम्यानचा ओव्हरहेड वायरचा खांब कोसळल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. प्रचंड वादळी वार्‍यामुळे खांब कोसळला. धीम्या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली आहे. परिणामी घाटकोपर या स्टेशनवर प्रचंड गर्दी झाल्याचं दिसून येतं आहे. घाटकोपर ते वर्सोवा मेट्रो मार्गावर बॅनर कोसळल्याने ती वाहतूकही काही काळ ठप्प झाली होती जी आता मार्गावर येते आहे. तांत्रिक अडचणही तिथे निर्माण झाली होती मात्र आता ही वाहतूक पूर्वपदावर येते आहे. सेंट्रल रेल्वेने पोस्ट करत ही माहिती दिली आहे.
आठवड्याचा आज पहिला दिवस आहे. त्यामुळे लाखो नागरीक आज आपापल्या ऑफिस आणि कार्यालयांमध्ये पोहचले होते. नियोजित वेळापत्रकानुसार लाखो प्रवासी संध्याकाळच्या वेळेस आपले कार्यालयीन कामकाज पूर्ण करुन घराच्या दिशेला निघतात. पण ऐन गर्दीच्या वेळेस अचानक पाऊस आला. पाऊस आणि वादळी वार्‍यांमुळे ठाणे आणि मुलुंड रेल्वे स्थानक दरम्यान ओव्हरहेड वायरचा खांब कोसळला. त्यामुळे धीम्या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. परिणामी लोकल ट्रेनच्या लांबच्या लांब रांगा रेल्वे रुळावर बघायला मिळाल्या. बराच वेळ झाला तरी लोकल ट्रेन सुरु न झाल्यामुळे नागरीक लोकल ट्रेनच्या खाली उतरले आणि त्यांनी रेल्वे रुळावरुन पायी जाणं पसंत केलं.
ठाणे आणि मुलुंड दरम्यान झालेल्या बिघाडाची दखल मध्य रेल्वेने तातडीने घेतली आहे. या ठिकाणी कर्मचारी पोहचले आहेत. तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्याचा प्रयत्न सुरु आहे. ट्रेन कधी सुरु होतात या प्रतीक्षेत मुंबईकर आहेत. जी ट्रेन येते आहे त्या ट्रेनमध्ये गर्दी असूनही लोक जमेल तसा प्रवास करत आहेत. तर काही लोक प्रचंड गर्दी असल्याने वाट बघत ताटकळत उभे आहेत. घाटकोपर मधील होर्डिंग कोसळल्याची घटनाही घडल्याचे समोर आलं आहे. तर मुंबईतल्या प्रमुख भागांत धूळ आणि पावसाचं साम्राज्य आहे.

मुंबईतील वादळामुळे घाटकोपरच्या पूर्व द्रुगती मार्गावरील पेट्रोल पंपावर मोठं लोखंडी होर्डिंग कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून 59 जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच आतापर्यंत 67 जणांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. दरम्यान, या घटनेनंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी माध्यमांशी बोलताना, या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिल्याचे त्यांनी सांगितले.

ही घटना अतिशय दुर्देवी आहे. या घटनेची माहिती मिळताच मी लगेच मुंबई महापालिकेतील आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली. याठिकाणी महापालिकेचे अधिकारी पोहोचले आहेत. तसेच बचावकार्य सुरू आहे. या घटनेत जखमी झालेल्यांना रुग्णालयात उपाचराकरिता दाखल करण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. तसेच मुंबईतील सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश आयुक्तांना दिले आहेत. तसेच जे होर्डिंग अनाधिकृत आहेत, त्यावर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे आदेशही आयुक्तांना दिले आहेत. या घटनेत जखमी झालेल्यांच्या उपचाराचा खर्च सरकार उचलणार आहे. या घटनेत ज्यांच्या मृत्यू झाला आहे, त्यांना मुख्यमंत्री साहायता निधीतून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.

COMMENTS