Homeताज्या बातम्यादेश

बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले

नवी दिल्ली ः श्री बद्रीविशाल लाल की जयच्या घोषणांनी बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्यात आले. यावेळी 20 हजारांहून अधिक भाविक उपस्थित होते. याआधी ब्रह्म

शेतीचे आधुनिक ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
Rohini Khadse : रोहिनी खडसे यांच्या गाडीवर झालेल्या हल्लाचा मी निषेध करतो – आमदार चंद्रकांत पाटील
आरक्षणप्रश्‍नी मराठा आंदोलक आक्रमक

नवी दिल्ली ः श्री बद्रीविशाल लाल की जयच्या घोषणांनी बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडण्यात आले. यावेळी 20 हजारांहून अधिक भाविक उपस्थित होते. याआधी ब्रह्ममुहूर्तावर मंदिराबाहेर गणेशपूजा केली गेली. यानंतर पुजार्‍यांनी द्वारपूजन केले. मंदिराचा दरवाजा तीन चावीने उघडला गेला. दरवाजे उघडताच प्रथम दर्शन अखंड ज्योतीचे होते. 6 महिन्यांपासून ती प्रज्वलित आहे. यानंतर बद्रीनाथवर ठेवलेली तुपाची चादर काढून टाकण्यात आली. जी 6 महिन्यांपूर्वी दरवाजे बंद करताना देवाला अर्पण केली जाते. ही चादर प्रसाद म्हणून वाटली जाणार आहे. गेल्या वर्षी 14 नोव्हेंबरला मंदिराचे दरवाजे बंद करण्यात आले होते.

COMMENTS