Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संत निरंकारी मंडळाच्या वतीने 13 मे रोजीबाबा हरदेव सिंहजी यांच्या स्मृतीत ‘समर्पण दिवस’चे आयोजन

अहमदनगर ः मानवता हाच खरा धर्म असून, धर्म जोडण्याचे काम करतो, तोडण्याचे नव्हे, अशी शिकवण देणारी दिव्यविभुती शांतीदूत बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच

गणेश अंबिलवादे यांचा व्हिजन महाराष्ट्र दिवाळी अंक प्रकाशित
कोल्हे साखर कारखान्यातील इथेनॉलचा ऑईल कंपन्यांना पुरवठा
आत्मा मालिकची खो-खो राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण कामगिरी

अहमदनगर ः मानवता हाच खरा धर्म असून, धर्म जोडण्याचे काम करतो, तोडण्याचे नव्हे, अशी शिकवण देणारी दिव्यविभुती शांतीदूत बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या पावन स्मृतीप्रित्यर्थ संत निरंकारी मंडळाच्या वतीने सोमवार 13 मे 2024 रोजी ‘समर्पण दिवस’ समारोहाचे आयोजन करण्यात आले असून, मुख्य कार्यक्रम संत निरंकारी आध्यात्मिक स्थल समालखा येथे सायंकाळी सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि राजपिता रमितजी यांच्या पावन उपस्थितीत होईल, त्यामध्ये मोठ्या संख्येने निरंकारी भक्तगण सहभागी होऊन बाबा हरदेव सिंहजींच्या प्रति आपली श्रद्धासुमने अर्पित करतील.
मंडळाच्या नगर शाखेच्यावतीने सुद्धा सोमवार 13 मे रोजी सायंकाळी 7 ते 9 या वेळेत मिस्किन रोड, नगर स्थित निरंकारी सत्संग भवन येथे सत्संग प्रवचनांचा कार्यक्रम आयोजित केला असून, नगर शहर व परिसरातील निरंकारी भक्तगण सहभागी होणार आहेत, अशी माहिती मंडळाचे नगर झोन प्रमुख हरिष खुबचंदानी यांनी दिली. तसेच समर्पण दिवस निमित्त सत्संग समारोहाचे आयोजन नगर जिल्ह्यातील मंडळाच्या शाखा असलेल्या अनेक ठिकाणी व नगर झोन अंतर्गत बीड, परभणी, नांदेड व हिंगोली या ठिकाणी सत्संग कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. जगामध्ये शांतीसुखाचे वातावरण स्थापित करण्यासाठी युगद्रष्टा बाबा हरदेवसिंहजी यांनी सद्भावपूर्ण एकत्व, “वसुधैव कुटुम्बकंम’’आणि“एकाला जाणा, एकाला माना, एक व्हा यांसारखे दिव्य संदेश दिले ज्यामध्ये नि:संशयपणे लोककल्याणाची भावना निहित आहे. याशिवाय त्यांनी परस्पर प्रेम आणि एकोप्याची भावना सदृढ करण्यासाठी भिंतीरहित विश्‍वची सुंदर संकल्पना मांडली व त्याला कृतीत उतरविले. वर्तमान काळात सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज युगद्रष्टा बाबा हरदेवसिंहजी यांचा हाच सत्य संदेश जनसामान्यांपर्यत पोचविण्यासाठी प्रयत्नशील आहे ज्यामधून निरंकारी मिशनचा प्रत्येक भक्त  प्रेरणा घेत असून आपले जीवन सार्थक करत आहे.

COMMENTS