Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मतदान जागृतीसाठी श्रीरामपुरात मोटारसायकल रॅली

श्रीरामपूर ः जनमनाची पुकार आहे, मतदान आमचा अधिकार आहे., आपला मताधिकार बजावूया, लोकशाहीला सक्षम बनवुया, अशा विविध फलक व घोषणांनी मतदार जागृतीसाठी

मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ मोटर सायकल रॅलीचे आयोजन
परशुराम जयंती निमित्ताने मोटार सायकल रॅली
राहाता शहरात गुढीपाडव्यानिमित्त मोटारसायकची रॅलीचे आयोजन

श्रीरामपूर ः जनमनाची पुकार आहे, मतदान आमचा अधिकार आहे., आपला मताधिकार बजावूया, लोकशाहीला सक्षम बनवुया, अशा विविध फलक व घोषणांनी मतदार जागृतीसाठी श्रीरामपूर नगरपरिषदेच्या लोकमान्य टिळक वाचनालयच्यावतीने मोटरसायकल रॅली काढण्यात आली.
                  श्रीरामपूर नगरपरिषदेच्या लोकमान्य टिळक वाचनालयच्यावतीने मतदान जनजागृती व 75 टक्क्यांपेक्षा अधिक मतदानासाठी  लोकशाहीचे पुस्तक उपक्रम मिशन अमृत साठी पुढाकार या निमित्ताने बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या बाईक रॅलीचे आयोजन प्रांताधिकारी तसेच नगरपालिकेचे प्रशासक अधिकारी किरण सावंत पाटील व मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते यावेळी उपमुख्याधिकारी अय्युब शेख, ग्रंथपाल स्वाती पुरे, खोब्रागडे, सुर्यकांत गवळी, सिध्दार्थ गवारे, संजय प्रधान, सचिन जोगदंड, संदिप कारवाळ, स्वप्निल माळवे, राजेश जेधे, सातदिवे, साक्षी अहिरे, मंगल रेड्डी,रुक्मिणी क्षत्रिय,संगिता रासकर,संजय आरणे, नितीन पवार,अमोल साळुंके, ज्ञानेश्‍वर चव्हाण आदि उपस्थित होते. श्रीरामपूर नगरपरिषदेपासुन बाईक रॉलीची सुरवात करण्यात आली, शिवाजी रोड, गिरमे चौक, भगतसिंग चौक,मेनरोड, लोकमान्य टिळक वाचनालय मार्ग, गांधी पुतळ्यापासुन नगरपालिका कार्यालयात येऊन समारोप झाला.

COMMENTS