श्रीरामपूर ः भारतीय संस्कृतीचे भाष्यकार, देशभक्त, प्रबोधनशील साहित्यिक पांडुरंग सदाशिव साने उर्फ सानेगुरुजी यांनी 1930 साली मांडलेल्या’ आंतरभारती

श्रीरामपूर ः भारतीय संस्कृतीचे भाष्यकार, देशभक्त, प्रबोधनशील साहित्यिक पांडुरंग सदाशिव साने उर्फ सानेगुरुजी यांनी 1930 साली मांडलेल्या’ आंतरभारती’ या अमृतमहोत्सवी संस्थेचा वर्धापनदिन श्रीरामपुरातील ’आंतरभारती’ शाखेतर्फे विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
श्रीरामपूर ’आंतरभारती’ शाखेचे अध्यक्ष सुभाष लिंगायत यांनी मांडलेल्या नियोजनानुसार व्याख्याने, सानेगुरुजींच्या आठवणी आणि साहित्यचर्चा अशा विविध उपक्रमानी आंतरभारती वर्धापनदिन साजरा झाला. विद्येची देवता श्रीसरस्वतीमाता प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख वक्ते माजी प्राचार्य टी.ई. शेळके तर अध्यक्षस्थानी अरविंद वाणीसर होते. संयोजक डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी स्वागत, प्रास्ताविकमधून साने गुरुजी यांचे चरित्र आणि साहित्यनिर्मितीची चर्चा केली. कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड गावी 24 डिसेंबर 1899 रोजी त्यांचा जन्म झाला तर त्यांचे निधन(आत्महत्या)11जून 1950 रोजी झाले.51 वर्षाचे जीवन लाभलेल्या साने गुरुजींनी 80 पुस्तके लिहिली.1924 ते 1930 या काळात त्यांनी शिक्षक म्हणून कार्य केले. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनामुळे त्यांना1930 ला त्रिचनापल्ली तुरुंगात जावे लागले. तेथे असताना साने गुरुजींचा दक्षिणेतील स्वातंत्र्य योद्ध्यांचा परिचय झाला. आपण प्रांतीय भाषा शिकणे गरजेचे आहे, ते राष्ट्रीय एकात्मतेसाठी गरजेचे आहे यातूनच ’आंतरभारती’ ही संकल्पना उदयाला आली.ते1942 च्या स्वातंत्र्यलढ्यात उतरले. असे भाषिक विचार मांडले. प्रमुख वक्ते माजी प्राचार्य टी.ई. शेळके यांनी भारतमाता आणि आई यांचे महत्व विशद करून आंतरभारतीचे महत्व विशद केले. यावेळी माजी तहसिलदार दत्तात्रय रायपल्ली, विजयाताई रायपल्ली, विलासराव कुलकर्णी, वैदेही कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त करून साने गुरूजींचे देशप्रेम सांगितले. अरविंद वाणीसर यांनी अध्यक्षीय भाषणातून साने गुरुजींचा सहवास आणि मोठेपणा विशद केला. साने गुरुजीनीच माझ्या बारश्याला माझे नाव अरविंद असे ठेवले, ही कौटुंबिक नात्याची आठवण सांगितली. साने गुरुजींच्या शैक्षणिक विचार, संस्कारामुळे आमचा शेतकरी वाणी परिवार सुशिक्षित कसा झाला, त्या आठवणी सांगितल्या. आंतरभारती संकल्पना आणि भारतीय लोकशाही यांचे नाते विशद केले. सुभाष लिंगायत यांनी ही शाखा सुरु करून समतेचा आणि ममतेचा आदर्श जनमनात रुजवित असल्याचे महत्व सांगितले. विजयाताई रायपल्ली यांनी आभार मानले.
COMMENTS